Banana Farming : पारंपरिक कंदाच्या लागवडीपेक्षा उतिसंवर्धित रोपांची लागवड ही अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यातही सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मूळ वाणांचे गुणधर्म, एकाच वेळी निसविण्याची क्षमता व व्यवस्थापनातील सुलभता यामुळे केळीची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते.