डॉ. याहयाखान पठाण, डॉ. सुनिता चौगुले, डॉ. ऋषिकेश काळेजनावरांचे नियमित आणि वेळेवर लसीकरण केल्यास कळपात आजाराचा प्रसार रोखता येतो, पशुधनाचे आरोग्य सुधारते, उत्पादनक्षमता वाढते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येते. काही प्राणिजन्य आजार मानवांपर्यंत पसरण्याचा धोका कमी होतो. पशुपालकांनी लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवून पशुतज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करावे..कोणतीही वैद्यकीय समस्या उद्भवल्यानंतर त्यांच्या दुष्परिणामांना सामोरे जाण्याऐवजी ती टाळण्यासाठी सक्रिय उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे असते. त्याच अनुषंगाने पशुधनाला आजारांच्यापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण हा अतिशय प्रभावी असा उपाय ठरतो. पशुधनाला नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होते. पशुधनासाठी अत्यावश्यक लसनिर्मिती क्षेत्रात पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेचा मोठा वाटा आहे..Livestock Health: थंडीच्या काळातील जनावरांचे व्यवस्थापन .महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ही राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत पाळीव प्राणी व पक्षी यांच्यासाठी आजार प्रतिबंधात्मक लसमात्रा आणि निदानासाठी आवश्यक जैव पदार्थांचे उत्पादन करणारी एकमेव राज्यस्तरीय संस्था आहे. या लसमात्रा तयार करताना आधुनिक वैज्ञानिक पद्धती, काटेकोर गुणवत्ता नियंत्रण आणि सुरक्षतेची अत्युच्च मानकांची खात्री केली जाते, ज्यामुळे पशुपालकांना विश्वासार्ह व परिणामकारक लसमात्रा उपलब्ध होत आहेत..संस्थेअंतर्गत पाळीव पशुधन व कोंबड्यांना लागणाऱ्या जिवाणू व विषाणू लसमात्रा, अभिकारक द्रावणे तयार केली जातात. या लसमात्रा राज्यभरातील सर्व राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषद पशुवैद्यकीय संस्थांना विनामूल्य पुरविल्या जातात, ज्या पशुधनास लसीकरण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. सर्व लसमात्रांचे उत्पादन औषधी व प्रसाधने कायदा-१९४५ च्या शेड्यूल-एम मध्ये विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून करण्यात येते. लस उत्पादन झाल्यानंतर त्या वितरण करण्यापूर्वी त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या आधुनिक व काटेकोर पद्धतीने चाचणी व गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत करण्यात येतात..जिवाणू लस उत्पादन विभागसंस्थेच्या जिवाणू लस उत्पादन विभागामार्फत पशुधनातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार या आजारांवरील लसमात्रांचे उत्पादन करण्यात येते.कोंबड्यांतील साल्मोनेल्ला रोगाच्या निदानासाठी वापरले जाणारे “Salmonella Coloured Antigen” तसेच, गायी-म्हशीमधील मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या कासदाह आजाराच्या प्राथमिक व क्षेत्रीय स्तरावरील तात्काळ निदानासाठी अत्यंत उपयुक्त सीएमटी रिएजंट याचे या विभागांतर्गत उत्पादन केले जाते.सध्या संस्थेत जिवाणू लस उत्पादनासाठी आधुनिक फरमेंटर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत असून आदर्श उत्पादन पद्धतींच्यामानांकनानुसार लस उत्पादनाची प्रक्रिया आणि आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येत आहे..Livestock Health: हिवाळ्यामध्ये जनावरांना द्या ऊर्जायुक्त आहार.कोंबड्यासाठी लस,विषाणू लस उत्पादन विभागराष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कुक्कुट व विषाणू लस उत्पादन विभागात अत्याधुनिक प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामार्फत पशुधन व कुक्कुट यांच्यासाठी पीपीआर, मेंढ्यांची देवी, लम्पी चर्म आजार,शेळ्यांमधील देवी, कोंबड्यांमधील देवी, मरेक्स आजार, मानमोडी या विषाणूजन्य लसमात्रांचे तंत्रशुद्ध पद्धतीने उत्पादन केले जाते. आदर्श उत्पादन पद्धतींच्या मानांकनानुसार फलित अंड्यांची निवड करण्यापासून ते अंतिम लसमात्रा उत्पादनापर्यंत अर्धस्वयंचलित संयंत्रांचा वापर करण्यात येत आहे..पशुधनाचे लसीकरणनिरोगी पशुधनास लसीकरण करावे. आजारी पशुधनास उपचार करून निरोगी झाल्यावरच लसीकरण करावे. लसीच्या अधिकतम परिणामकारकतेसाठी लसीकरण करण्यापूर्वी पशुधनास जंत निर्मूलनाची औषधे द्यावीत. लसीकरण करण्यापूर्वी पशुधन ताण विरहित असावे. खूप लांबचा प्रवास किंवा अधिक काम यामुळेही ताण येऊ शकतो. लसीकरण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावे.. विषाणूजन्य लस तयार करताना वापरावयाच्या लस द्रावणाची २ ते ४ अंश सेल्सिअस तापमानात साठवणूक करावी.लसीकरणापूर्वी लसमात्रेची बाटली व्यवस्थित हलवून घ्यावी. विषाणूजन्य लस एकदा पुनर्रचित केल्यानंतर पुढील २ ते ४ तासांमध्ये वापरण्यात यावी. लसीकरणाच्या वेळा व वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे. लसीकरणाची राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियानांतर्गत नोंद ठेवावी..पशुधनातील लसीकरणाचे महत्त्व याबाबत पशुपालकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. पशुधनातील विविध लसीकरणाचे सुयोग्य नियोजन करून एका गावात एकाच वेळी अधिकाधिक लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. लसीकरण करण्यासाठी पशुवैद्यकाची मदत घ्यावी. लस उत्पादकाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. काही वेळा पशुधनास लसीची प्रतिकूल प्रतिक्रिया येऊ शकते, त्यामुळे लसीकरणाच्यावेळी आपत्कालीन औषधे जवळ ठेवावीत.- डॉ.सुनिता चौगुले ९१५८३०३१०७(साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, औंध, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.