Satara News : पुढील काही दिवसांत रब्बी हंगाम सुरू होणार आहे. या हंगामात खतांचा तुटवडा भासू नये, शेतकऱ्यांना शेती कामकाजात अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल एक लाख सहा हजार टन खतांचा साठा मंजूर केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेती हंगाम सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, करडई, बटाटा, मोहरी, जवळ, तीळ यांसह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक व सेंद्रिय खतांची मागणी वाढते. यंदाच्या सततच्या पावसाने रब्बीतील पेरणी जास्त होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून खतांचा तुटवडा निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता..Rabi Season : रब्बीसाठी पाच हजार क्विंटल बियाणे अनुदानावर होणार वितरित .यंदा, मात्र जिल्हा परिषदेने आगाऊ नियोजन करून शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी खतांचा पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर व्यवस्था केली आहे. या साठ्यात युरिया, डीएपी, एनपीके, सुपरफॉस्फेट, पोटॅश, संयुक्त खतांचा समावेश आहे. खत वितरण केंद्रांना वेळेत साठा पोहोचावा, यासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. .जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी दारोदार भटकंती करावी लागणार नाही, तर त्यांच्या शेतात वेळेत शेती कामकाज होईल. योग्य नियोजन, पुरेसा साठा आणि प्रशासनाचा तत्पर प्रतिसाद यामुळे यंदाचा रब्बी हंगाम ‘खतविना अडचण नाही’ असा ठरण्याची आशा व्यक्त केली जात आहे..Rabi Season : रब्बी पेरणीची पूर्वमशागत वेगात.रब्बी हंगामासाठी एक लाख सहा हजार २५० टन खते मंजूर केले आहेत. यामध्ये सद्यःस्थितीत गेल्या हंगामातील खते व रब्बीतील खते असे मिळून ४९ हजार २०८ टन खते उपलब्ध झाली आहेत. तर, पाच हजार ९९१ टन चालू हंगामातील खते प्राप्त झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे..पुढील काही दिवसांत सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात खतांचा तुटवडा पडू नये यासाठी एक लाख ६ हजार २५० टन खते मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे रब्बीत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच, शेतकऱ्यांना अधिक दराने खत विक्री होऊ नये यासाठी तपासणी पथकही तयार करण्यात आले आहे.- गजानन ननावरे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.