Mumbai News: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा आणि नगराध्यक्ष निवडून आणणाऱ्या भाजपला महानगरपालिका निवडणुकीमध्ये मात्र अखेरच्या टप्प्यात विरोधी पक्षांशी दोन हात करावे लागत आहेत. मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, लातूर, नाशिक, सांगली आदी महानगरपालिकांमध्ये भाजपसमोर कडवे आव्हान विरोधकांनी उभे केले आहे. मुंबईत रविवारी (ता. ११) झालेल्या ठाकरे बंधूंच्या सभेमुळे वातावरण निर्मिती झाली आहे..राज्यभरात ६९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून त्यापैकी ४४ केवळ भाजपचे आहेत. त्यावरून भाजपवर जोरदार टीका होत आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे सर्वाधिक २४३१ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने महानगरपालिका निवडणुकांमध्येही जोरदार प्रचार केला होता..Zilla Parishad elections : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांना १५ दिवसांची मुदत वाढ; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश.प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत जोरदार चुरशीची झाली. मुंबई महानगरपालिकेसाठी रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा झाली. यात उद्योगपती अदानी समूहाला देण्यात येणारे प्रकल्प आणि भूखंड यावर बोट ठेवत राज ठाकरे यांनी मांडलेल्या नकाशाने वातावरण निर्मिती झाली..नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईकनवी मुंबई महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वनमंत्री नाईक यांनी शिंदे यांना आव्हान दिले आहे. तर नाईक यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारत आपल्या समर्थकांना तिकीट दिले. त्यावरून म्हात्रे यांनी नाईक यांना आव्हान दिले. मात्र नाईक यांनी शिंदे यांनाच टारगेट केले. शिंदेंना ठाणे महानगरपालिकेपुरतेच सीमित ठेवण्याची रणनीती भाजपनेच आखल्याचे स्पष्ट होत आहे..West Bengal Election: पश्चिम बंगालमधील ‘युद्धा’ची नांदी.पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी जोरदार लढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा तेथे पणाला लागली असून आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या एकेरी टीकेमुळे वातावरण तापले आहे. पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असले तरीही भाजपने आक्रमक प्रचाराने वातावरण निर्मिती केली..कोल्हापूरमध्ये सतेज पाटील विरुद्ध सर्वकोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील विरुद्ध सर्व अशी लढत सुरू आहे. यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर हे पाटील यांच्या विरोधात एकवटले आहेत..लातूरमध्ये वादग्रस्त विधानाची चर्चाभाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर नगरपालिका निवडणुकीत लोकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचा संदर्भ देत विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकल्या जातील, असे विधान केले. त्यावरून त्यांच्यावर टीकेच झोड उठत आहे. चव्हाण यांच्या वक्तव्याने काँग्रेसला उर्जितावस्था मिळाल्याचेही बोलले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.