Akola Newa: अकोला पश्चिम विदर्भातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चुरशीची लढत रंगली असून मंगळवारी ( ता. २) अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदारांना आपला लोकशाही हक्क बजावता येणार आहे. त्यानंतर उद्या (ता. तीन) सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून निकाल लागल्यानंतर संबंधित क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल होईल..अकोला जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, हिवरखेड आणि बार्शीटाकळी या पाच नगरपरिषद/नगरपंचायतींसाठी एकूण ३९ अध्यक्षपदाचे आणि ७०७ सदस्यपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी थेट लढतीमुळे मतदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे..Apmc election : बाजार समिती निवडणुकांमध्ये शेतकरी उमेदवारीवरून संभ्रम| ॲग्रोवन.बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव-जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा, शेगाव आणि सिंदखेडराजा या ११ नगरपालिकांसाठी अध्यक्षपदाच्या ८७ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सदस्यपदासाठी तब्बल ११७० उमेदवार मैदानात असून मलकापूरमधील दोन आणि खामगावमधील एक सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत..Local Body Election: ‘त्या’ नगरपरिषदा, नगरपंचायतींचे भवितव्य २१ जानेवारीला ठरणार.वाशीम जिल्ह्यात वाशीम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर आणि मालेगाव या पाच नगरपालिकांमध्ये अध्यक्षपदासाठी ३५ उमेदवार असून सदस्यपदासाठी ५४८ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण २२ ठिकाणच्या निवडणुकांमुळे पश्चिम विदर्भाचे राजकीय वातावरण तापले असून मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सोमवारी (ता. एक) दुपारनंतर मतपेट्यांसह कर्मचारी रवाना व्हायला सुरुवात झाली होती. .नेत्यांच्या प्रतिष्ठा पणालाया निवडणुकीत बहुतांश ठिकाणी राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिल्या असून महायुती व महाविकास आघाडीच्या पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. प्रामुख्याने महायुतीतील घटक पक्षांनी ठिकठिकाणी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकलेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी प्रचार सभा घेतल्या. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही सभा गाजवल्या. स्थानिक आमदार, खासदारांनी पूर्णवेळ प्रचाराला दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.