Tiger Sighting: उक्कडगाव शिवारात पुन्हा वाघाचे दर्शन
Forest Department: बार्शी तालुक्यातील उक्कडगाव शिवारात पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी शेतात काम करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना वाघ दिसला असून तो वनक्षेत्राच्या दिशेने निघून गेल्याची माहिती मिळाली आहे.