Wildlife Conservation: आकारने लहान आणि व्याघ्र दर्शनाचे हमखास ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात वर्ष २०२४ -२५ च्या व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा पार पडला. त्याचा अंतिम अहवाल वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूशन देहरादूनच्या तज्ज्ञांनी जाहीर केला. या अहवालात बोर व्याघ्र प्रकल्पात तब्बल १४ प्रौढ वाघ असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे..नावलौकिक मिळवत असलेल्या या व्याघ्र प्रकल्पातील नर व मादी प्रौढ वाघांची संख्या जाणून घेण्याकरिता कोअर आणि बफर क्षेत्रात प्राणी गणना करण्यात आली. वर्ष २०२४-२५ मध्ये प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्रात तब्बल ३९६ ट्रॅप कॅमेरे लावत व्याघ्र गणनेचा चौथा टप्पा राबविण्यात आला..Kolhapur Tiger Corridor: व्याघ्रप्रकल्पाबाबत स्थानिकांचे म्हणणे केंद्राला कळविणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर.नियोजित कालावधी नंतर ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेल्या वन्यप्राण्यांचे चित्रीकरण वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूशनला पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पाठविण्यात आले. याच चित्रीकरणाचे सूक्ष्म निरीक्षण करून प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला. हा अहवाल बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाला मिळाला. मोठे जलाशय इतर वन्यजीवांची मोठ्या संख्या यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरतो आहे..या व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार नुकताच करण्यात आला. सध्या १३ हजार ८०० हेक्टरचे कोअर क्षेत्र तर ६७ हजार ८१४.४६ हेक्टर बफर क्षेत्राची नोंद या प्रकल्पात करण्यात आली आहे. सध्या असलेल्या क्षेत्रफळाच्या विचारात येथे वाघांची संख्या जास्तच आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पात वनदर्शनाकरिता विदर्भातील आणि विदर्भाबाहेरील पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. आतापर्यंत अनेक व्हीआयपींनी भेटी दिल्या आहेत..Tiger Attack: पशुधन विकास अधिकाऱ्यांसह चौघांवर वाघाचा हल्ला .सहा नर, तर सात माद्यांचा अधिवासवाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूशनच्या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार बोर व्याघ्र प्रकल्पात सहा नर तर सात मादी व एक सेक्स अनआयडेंटिफाइड वाघाचा समावेश आहे. यातील सात पट्टेदार वाघांचा कोअर क्षेत्रात तर सात वाघांचा बफर क्षेत्रात अधिवास असल्याचे सूक्ष्म निरीक्षणानंतर डेहराडून येथील तज्ज्ञांनी अहवालात स्पष्ट केले आहे..यापूर्वीच्या गणनेत बोर व्याघ्र प्रकल्पात १३ प्रौढ वाघांची नोंद घेण्यात आली होती. आता ही संख्या १४ वर पोहोचली. बोर व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांच्या संवर्धनासाठी उपयुक्तच ठरत आहे.मंगेश ठेंगडी, उपसंचालक, बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.