Wildlife Conflict: उमरझरी येथील माया सोनवणे या वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या. त्यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, वन विभागाकडून मृताच्या कुटुंबाला १० लाखांचा धनादेश देण्यात आला असून, उर्वरित १५ लाख रुपये येत्या १० दिवसांत दिले जाणार आहेत..उमरझरी शिवारात शेतात काम करत असताना वाघाने हल्ला करून माया सोनवणे यांना गंभीर जखमी केले होते. परिसरात वाघाचे वारंवार हल्ले होत असल्याने नागरिकांत असंतोष वाढला असल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता..Tiger Death Issue: राज्यातील ११० वाघांच्या मृत्यूंना मनुष्य जबाबदार.सायंकाळी मृतदेह येथे आणण्यात आला. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी व माहेश्वरी नेवारे यांनी दिवसभर उमरझरी येथे थांबून गावकऱ्यांना शांत केले.तसेच सर्व मागण्या वन विभागाकडून मान्य व्हाव्यात, यासाठी मध्यस्थीची भूमिका त्यांनी बजावली. .Farmer Compensation: भरपाईची रक्कम मुख्यमंत्री साह्यता निधीत जमा करा.यावेळ वनाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत परिसरातील शेतकऱ्यांसाठी बंद केलेली जड वाहतूक पुन्हा सुरू करण्यातल यावी. नरभक्षक वाघिणीला पिंजऱ्यात पकडून इतरत्र हलवण्याची मागणी करण्यात आली. या मागण्या वन विभागाने त्वरित मान्य केल्या. तसेच सोनवणे कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले..यावेळी वन अधिकारी यांनी १० लाखांचा धनादेश सोनवाने कुटुंबीयांना दिला. तसेच उर्वरित १५ लाखांचा चेक पुढील १० दिवसांत आणून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सहाय्यक वन संरक्षक ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी यांच्यासह साकोलीचे पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.