डॉ. विवेक संगेकर, डॉ. बालाजी अंबोरेगोचीड तापाने बाधित गायींमध्ये रक्ताचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय वाढतो. या आजारामुळे लाल रक्तपेशींचे अपघटन होऊन कावीळ होते. विशेषत: जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई गोचीडतापानंतर कावीळ आजाराने त्रस्त आहेत. कावीळ निष्पन्न झाली असेल तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने यकृताला साहाय्य करणारी औषधी वापरून उपचार सुरू करावेत..गोचीड ताप हा गाईमध्ये आढळणारा महत्त्वाचा आजार आहे. हा आजार गोचिडामुळे पसरतो. या आजारामध्ये गाईला ताप येतो, लसिका ग्रंथी सुजणे, त्यानंतर गाईचे खाणेपिणे कमी होऊन गायीमध्ये अशक्तपणा येतो, दूध उत्पादन घटते. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा आजार जिवाला धोका निर्माण करू शकतो तसेच पशुपालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो..Fever Patient : राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट.गोचीड तापाने बाधित गायींमध्ये रक्ताचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय वाढतो. या आजारामुळे लाल रक्तपेशींचे अपघटन होऊन कावीळ उद्भवण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषत: जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई गोचीडतापानंतर कावीळ आजाराने त्रस्त होतात. .कारणेलाल रक्तपेशींचे अपघटन. बाह्य परजीवींमुळे रक्तातील प्रमाण कमी होणे.सतत रक्ताचे प्रमाण कमी राहिल्यामुळे रक्तपेशींच्या पुनर्निर्मितीसाठी प्रथिनांची वाढलेली गरज.वाढलेल्या बिलिरुबिनचे संयुगीकरण व उत्सर्जन करण्यास यकृत असमर्थ असणे. आदिजीव बाधित लसिका पेशी यकृतात जाऊन यकृत पेशींना नुकसान करणे आणि बिलिरुबिनचे योग्य पचन व उत्सर्जन करणे अशक्य बनवणे..Tick Parasite : गोठ्यात गोचीड होवू नये म्हणून घ्या 'अशी' काळजी .गोचीड तापामुळे यकृतावर होणारा ताण.उपचारासाठी वापरली जाणारी अविवेकी औषधे यामुळे यकृतावर होणारा परिणाम.यकृतावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आहारामध्ये असणारा समावेश.जास्त दूध देणाऱ्या गायींमध्ये यकृतामध्ये चरबीची साठवणूक.आहारामध्ये यकृतासाठी आवश्यक प्रथिनांचा अभाव. .लक्षणे त्वचा, डोळ्याच्या पापणीची आतील बाजू आणि सर्व दिसणाऱ्या श्लेष्मल पडदे पिवळे पडतात.कानांच्या आतील भागावर, उदराच्या पातळ भागावर व पायांच्या आतील भागावर पिवळसर छटा दिसते. गंभीर अवस्थेत संपूर्ण त्वचा पिवळसर होते.गायींना खूप ताप येतोभूक आणि रवंथ प्रक्रिया मंदावते. शरीरास सुस्ती येते..थकवा जाणवणे, धाप लागते, श्वास घेण्यास त्रास होतो. नाकातून स्त्राव येतो, पोटदुखी होते. शेण घट्ट होते. त्यानंतर अतिसार, जुलाबाचा त्रास दिसतो. काही वेळा शेण काळसर किंवा रक्तमिश्रित असते लघवी पिवळसर दिसते, कधी रक्तमिश्रित होते. शरीरातील प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यास त्यांच्या अंगावरचा मांसकळा कमी होतो. शरीर कृश होऊ लागते. वजन झपाट्याने घटते. याशिवाय पोळी आणि जबड्याखालच्या भागात पाणी साचल्यामुळे तो भाग सुजल्यासारखा दिसतो.रक्त गोठण्यास विलंब होतो. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते, भरपूर प्रमाणात रक्तस्राव होऊन गंभीर स्वरूपाच्या आजारात गाई कोमात जातात. .Livestock Care: जनावरांतील ‘ॲस्पिरेशन न्यूमोनिया’ची लक्षणे अन् उपाय.निदान गोचीड ताप संक्रमित गाईमध्ये त्वचा, डोळ्याच्या पापणीची आतील बाजू आणि सर्व दिसणाऱ्या श्लेष्मल पडदे पिवळे पडतात. ही लक्षणे दिसताच तपासण्या कराव्यात. रक्त तपासणी (CBC): रक्तातील विविध घटकांचे प्रमाण तपासले जाते, ज्यातून रक्तक्षय, संसर्ग किंवा इतर बिघाड समजू शकते.यकृत कार्य चाचणी (LFT): या तपासणीतून यकृताचे कार्य व्यवस्थित आहे का, कावीळ कोणत्या स्वरूपाचा आहे आणि त्याची नेमकी उत्पत्ती कुठे आहे, हे निश्चित करता येते..सोनोग्राफी ः यकृताची तपासणी करून काविळीचे निदान करू शकतो. उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय सर्वप्रथम गोचीड निर्मूलन करणे आवश्यक आहे, जेणेकरून गोचीड तापाची बाधा होणार नाही.बाधित गायींवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करणे अत्यावश्यक आहे. रक्तक्षय टाळल्यास कावीळ होण्याचा धोका कमी होतो..जर रक्तक्षय झाला असेल तर त्याचे लवकरात लवकर उपचार करावेत. गोचीड तापामुळे यकृतावर येणारा ताण पशुवैद्यकांच्या सल्ल्याने कमी करावा.कावीळ निष्पन्न झाले असेल तर यकृताला साहाय्य करणारी औषधी वापरून उपचार सुरू करावेत.आहारामध्ये मीठ व स्निग्ध पदार्थ कमी करून, त्याऐवजी प्रथिनयुक्त आणि उच्च ऊर्जा आहार द्यावा..कावीळ बाधित गायींचे खाण्यापिण्याचे प्रमाण घटल्यास सलाईन थेरपी पशुवैद्यकांच्या मदतीने द्यावी, जेणेकरून गाय कोमात जाणार नाहीत.यकृतावर परिणाम करणारे खाद्य जसे की, सरकी पेंड, बार्ली, भुईमुगाचे चारवट इत्यादी टाळावे.यकृत कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक प्रथिने व रक्तवाढीची औषधी द्यावीत. गूळ दिल्यास रक्तवाढीस मदत होते.कावीळ बरा होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे पशुपालकांनी संयम बाळगून उपचार सुरू ठेवणे गरजेचे आहे. - डॉ. विवेक संगेकर : ९०७५८८९४९०(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.