Beed News: टाकरवणसह परिसरात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका तूर पिकाला बसला असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. सध्या परिसरात तुरीच्या काढणी आणि मळणीला वेग आला असला, तरी एकरी केवळ ४ ते ५ क्विंटल इतकाच उतारा मिळत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील शेतकरी प्रामुख्याने कापूस पिकात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करतात..एक एकर क्षेत्रावरील तूर काढणीपर्यंत शेतकऱ्याला साधारण १५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यामध्ये बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरी आणि काढणीच्या खर्चाचा समावेश असतो. सध्या बाजारात चांगल्या दर्जाची तूर ७ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. मात्र, उत्पादनात झालेली घट पाहता हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यातच पिकात ओलावा असल्यास व्यापारी दरात आणखी कपात करत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे..Farmer Income Crisis: सरलेले वर्ष शेतीसाठी निराशाजनक.मजूरटंचाई, हवामानाचे सावटसध्या सर्वत्र मळणीचे काम जोरात सुरू आहे, मात्र मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे. परिणामी, शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनेच मळणी आणि झोडणीची कामे उरकून घेत आहेत. गेल्या चार दिवसांपासून परिसरात ढगाळ हवामान असून, यामुळे शेंगांमध्ये ओलावा वाढून पीक काळवंडण्याची भीती निर्माण झाली आहे. .Farmer Crisis: महाग कृषी निविष्ठांमुळे बागायतदारांचा खर्च वाढला.थोडा जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, या भीतीने शेतकरी दिवसरात्र मेहनत घेऊन मळणी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने सुरुवातीला पीक जोमात होते. मात्र, ऐन दाणे भरण्याच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीचा दाणा पूर्णपणे भरला नाही. याचा सर्वाधिक फटका कोरडवाहू शेतकऱ्यांना बसला असून त्यांच्या पिकाचे वजन आणि उत्पन्न दोन्ही घटले आहे. यासोबतच मर रोग आणि अळीच्या प्रादुर्भावामुळेही उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे..यंदा तालुक्यात तुरीची पेरणी कमी झाली आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पीक वाया गेले, तर जिथे पीक आले तिथे उतारा कमी मिळत आहे. शेती आता परवडेनाशी झाली असून, काम कमी असल्यामुळे मळणीयंत्र मालकांनाही आर्थिक फटका बसत आहे.- कल्याण भिसे, मळणीयंत्र मालक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.