Washim News: मंगरूळपीर तालुक्यातील आदिवासीबहुल जनुना हे गाव आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही गावाला पक्का रस्ता नाही, शिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत..मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीलाही जिद्द, मेहनत आणि देशसेवेच्या स्वप्नाने हरवून टाकत या गावाने एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी यश मिळवले आहे. गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच कुटुंबातील तीन तरुणांची थेट सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) निवड झाली आहे..Tribal Sisters Success : दुर्गम गावातील बहिणींची एकाच वेळी एमबीबीएससाठी निवड.गावातील अल्पभूधारक लक्ष्मणराव ठाकरे यांचे पुत्र महादेव ठाकरे आणि गजानन ठाकरे यांच्या कुटुंबाने हे यश संपादन केले आहे. महादेव ठाकरे यांचे सुपुत्र गोपाल ठाकरे व रूपेश ठाकरे तसेच गजानन ठाकरे यांचे सुपुत्र सुभाष ठाकरे या तिघांची बीएसएफमध्ये निवड झाली आहे. .Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा .सुविधांचा अभाव, आर्थिक मर्यादा आणि ग्रामीण वास्तव असूनही या तिन्ही तरुणांनी अथक परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे स्वप्न साकार केले आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुर्वे यांनी ठाकरे कुटुंबाचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला..या वेळी अरुणराव उजवणे, महादेव ठाकरे, गजानन ठाकरे, उत्तमराव डाखोरे, शिवाभाऊ गोदमले, गजानन मांगाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.