Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. शुक्रवारी (ता. ५) शिक्षक दिनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. एकूण तीन वर्षांचे पुरस्कार दिले जाणार आहेत..अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांना आदर्श पुरस्कार दिले गेले नव्हते. यंदा सलग तीन वर्षांचे पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी कार्यक्रम आयोजित केला आहे. .Ahilyanagar ZP : अहिल्यानगर ‘झेडपी’तील गैरव्यवहाराची पाच सदस्यीय समिती करणार चौकशी.पालकमंत्री श्री. विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार निवडीसाठी शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी १०० गुणांची प्रश्नावली अद्ययावत करून जिल्हा परिषद अहिल्यानगरल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. परीक्षणानंतर पात्र शिक्षक व केंद्रप्रमुखांची यादी जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्तांनी पाठवली..पुरस्कारप्राप्त शिक्षक-केंद्रप्रमुख२०२२-२३ ः नरेंद्र राठोड (अकोले), सोमनाथ घुले (संगमनेर), सचिन अडांगळे (कोपरगाव), भारती देशमुख (राहाता), सविता साळुंके (श्रीरामपूर), अनिल कल्हापुरे (राहुरी), सुनील निकम (नेवासे), अंजली चव्हाण (शेवगाव), भागीनाथ बडे (पाथर्डी), एकनाथ चव्हाण (जामखेड), किरण मुळे (कर्जत), जाविद सय्यद (श्रीगोंदे), विजय गुंजाळ (पारनेर), साधना क्षीरसागर (अहिल्यानगर). केंद्र प्रमुख ः रावजी केसकर (पारनेर) व अशोक विटनोर (श्रीरामपूर)..Ahilyanagar ZP :अण्णासाहेब शिंदे सभागृहावर बुलडोझर; झेडपीच्या वारशावर घाला.२०२३-२४ ः पुष्पा लांडे (अकोले), संजय कडलग (संगमनेर), पितांबर पाटील (कोपरगाव), ललिता पवार (राहाता), योगेश राणे (श्रीरामपूर), सुनील लोंढे (राहुरी), सुनील आडसूळ (नेवासे), गोरक्षनाथ बर्डे (शेवगाव), नामदेव घायतडक (पाथर्डी), बाळू जरांडे (जामखेड), दीपक कारंजकर (कर्जत), स्वाती काळे (श्रीगोंदे), प्रकाश नांगरे (पारनेर), वर्षा कचरे (अहिल्यानगर), केंद्रप्रमुख ः ज्ञानेश्वर जाधव (दहिगावने, शेवगाव).२०२५ ः अनिल डगळे (अकोले), कैलास भागवत (संगमनेर), मंगला गोपाळे (कोपरगाव), मंगल भडांगे (राहाता), सुजित बनकर (श्रीरामपूर), जयश्री झरेकर (राहुरी), रूपाली खेडकर (नेवासे), विठ्ठल देशमुख (पाथर्डी), खंडेराव सोळंके (जामखेड), आबा सूर्यवंशी (कर्जत), नवनाथ वाळके (श्रीगोंदे), सचिन ठाणगे (पारनेर), वर्षा कासार (अहिल्यानगर) केंद्रप्रमुख ः विजय भांगरे (अकोले), रामदास बाबागोसावी (अहिल्यानगर)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.