Healthcare National Ranking: पुणे जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन
NABH Accreditation: पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या राजुर (ता. जुन्नर) धामारी (ता. शिरूर) जळगाव क. प. (ता. बारामती) या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना (आयुष) राष्ट्रीय पातळीवरील एनएबीएच मानांकन प्राप्त झाले असून, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.