Yavatmal News: वरिष्ठांच्या पूर्व परवानगीशिवाय गैरहजर राहणे, पत्रव्यवहाराची दखल न घेणे, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि दोन विद्युत सहायकांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे तिघांनाही ‘महावितरण’च्या सेवेतून कामयचे निष्कासीत करण्यात आल्याचे आदेश अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या निर्देशानुसार काढण्यात आले आहेत. .दारव्हा विभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ शरद ढगे, विद्युत सहायक इरशाद अहमद अली मोहम्मद आणि किशोर शिंदे असे निष्कासित केलेल्यांची नावे आहेत. काही कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता आणि योग्य पुरावा न सादर करता वर्षानुवर्षे गैरहजर असल्याची बाब अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या निदर्शनास आली होती..MSEDCL SMS Service : तेरा लाखांवर ग्राहकांना वीजसेवेची माहिती मिळते ‘एसएमएस’वर.या कर्मचाऱ्यांच्या पदाचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडला होता. या प्रकारामुळे महावितरण प्रशासनाला ग्राहकांच्या अनेकवेळा रोषाला सामोरे जावे लागले. वरिष्ठ तंत्रज्ञ ढगे आणि विद्युत सहायक शिंदे दोन्ही कर्मचारी दारव्हा तालुक्यातील लोही वितरण केंद्रावर कार्यरत होते. शरद ढगे जानेवारी महिन्यापासून परवानगी न घेत कार्यालयात अनुपस्थित होते..MSEDCL Support: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सौर कृषी पंपांसाठी नवी हेल्पलाइन.यापूर्वीही कार्यालयाची कुठलीही परवानगी न घेता २५ डिसेंबर २०२१ ते १ मार्च २०२२ या कालावधित कार्यालयात गैरहजर होते. त्याचबरोबर विद्युत सहायक किशोर शिंदे हे सुद्धा विनापरवानगी गैरहजर होते. विद्युत सहायक इरशाद अहमद अली मोहम्मद यांची दारव्हा ग्रामीण एकमध्ये पदस्थापना होती. ते सप्टेंबर २०२४ पासून परवानगी न देता गैरहजर आहेत..त्यांच्या अनुपस्थितीबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. अनुपस्थितीबाबत योग्य तो पुरावा सादर करावा, असेही कळविण्यात आले होते. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांनी योग्य पुरावा सादर केलाच नाही. त्यामुळे सेवेतून निष्कासित करण्याची कार्यवाही अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या निर्देशानुसार दारव्हा कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता यांनी केली. .कळंब परिसरात २ जुलैला सायंकाळच्या सुमारास वादळ, वारा आला होता. त्यामुळे उपकेंद्रातील सर्व फिडर काही काळासाठी बंद पडले होते. उपकेंद्रातील फोनसुद्धा बंद करून ठेवण्यात आले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.