Kolhapur News: उसाला आलेले तुरे, वजनातील घटीमुळे न होणारी भरती आणि मरगळलेली तोडणी यंत्रणा यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात अजूनही साधारण तीन ते साडेतीन लाख टन ऊस शेतातच उभा आहे. साधारण १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत यंदाचा हंगाम चालेल, अशी शक्यता कारखान्यातील सूत्रांनी वर्तविली आहे. या विभागातील पाचही साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट होत आहे..गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात दरवर्षी साधारण १७ ते १८ लाख टन उसाचे उत्पादन होते. सर्वाधिक चंदगड, त्यानंतर गडहिंग्लजमध्ये उसाचे उत्पादन अधिक आहे. आजऱ्यात सर्वात कमी उसाचे क्षेत्र असते. गडहिंग्लजचा गोडसाखर, आजरा कारखाना व चंदगडमधील ‘हेमरस’, दौलत व इको-केन कारखान्यात उसाचे गाळप झाले. अधिक पावसामुळे उसाला यंदा नोव्हेंबरमध्येच तुरे आले. लवकर गाळपाला गेलेल्या अशा उसाचे वजन चांगले भरले; परंतु जसे दिवस भरतील त्यानुसार तुरे फुटलेल्या उसाचे वजन घटू लागले. शेवटच्या टप्प्यात सध्या तुरे फुटलेलाच ऊस शिल्लक आहे. केवळ ऊसतोड मजुरांवरच ऊसतोड होत असल्याने वाहनांची भरतीही होईना झाली आहे. परिणामी, ऊसतोड मजुरांत मरगळआली आहे. त्याचा परिणाम गाळपावर होत आहे. .Sugarcane Harvest Delay: खानदेशात ऊस तोडणीची प्रतीक्षा.या भागातील उसाला उताराही चांगला असतो. परंतु, यंदा झेंड्यामुळे काही कारखान्यांच्या उताऱ्यातही घट आल्याचे सांगण्यात आले. गडहिंग्लज साखर कारखान्याचेच उदाहरण घेतल्यास दरवर्षी १२ च्या पुढे उतारा असतो. यंदा तो साडेअकरापर्यंतच आहे..खुशाली आली, शेतकऱ्यांना भुर्दंडदरम्यान, शेवटच्या टप्प्यात ऊस तोड टोळ्यांची व वाहनधारकाची खुशाली वाढल्याची चर्चा आहे. मध्यंतरी दोन ते तीन हजार रुपये टोळीचा असणारा दर आज तीन ते चार हजारांपर्यंत पोहाेचला आहे. वाहनधारकाची एंट्री वेगळीच आहे. शेतकऱ्यांची अगतिकता लक्षात घेऊन टोळीवाल्यांचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. कोण अधिक पैसे देईल, त्याच्या उसाला कोयता लावला जात आहे. उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे प्रत्येकाचा ऊस कारखाने नेणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड करून अधिक खुशाली देऊन ऊस बाहेरच्या कारखान्यांना पाठविण्यापेक्षा आपापल्या तालुक्यातील कारखान्यांना ऊस देण्याची गरज व्यक्त होत आहे..Banana Harvest Delay: खानदेशात उष्णतेने लांबला केळी काढणी हंगाम.रस्ता रुंदीकरणाचाही फटकागडहिंग्लज ते नागनवाडी या राज्यमार्गाचे रूंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता खोदला आहे. वाहने गडहिंग्लज कारखान्यापर्यंत येण्यास अडचण झाली आहे. गोडसाखरकडे नेसरी भागातील पुरवठा कमी प्रमाणात झाला. त्या भागातील वाहनधारकांचा चंदगडला ऊस पाठविण्याकडे कल वाढल्याने त्याचा परिणाम गोडसाखरवर झाल्याचे सांगण्यात येते..दृिष्टक्षेपात गाळप...गोडसाखर ः १ लाख ५५ हजार टनइको-केन ः २ लाख ६० हजार टनअथर्व - दौलत ः ३ लाख टनओलम - हेमरस ः ४ लाख १० हजार टन.तालुकानिहाय शिल्लक ऊसगडहिंग्लज ः सव्वालाख टनआजरा ः ७५ हजार टनचंदगड ः सव्वालाख टनापर्यंत.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.