Farmer Distress: गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर खरीप पिके नष्ट झाली आहेत, मात्र प्रशासनाने फक्त चार महसूल मंडळेच अतिवृष्टीत मानली आहेत. पर्जन्यमापकाच्या आकड्यांवर आधारित ही निर्णयप्रणाली शेतकऱ्यांच्या संतापाचे कारण बनली आहे.