Buldana News: राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांचा ४२८ वा जयंती सोहळा सोमवारी (ता.१२) त्यांच्या जन्मस्थळी असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राज्यासह देशातील विविध भागांतून हजारोंच्या संख्येने आलेले जिजाऊ भक्त राष्ट्रमातेच्या चरणी नतमस्तक झाले..पहाटेच जिजाऊ जन्मस्थळी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. जिजाऊ स्मारक येथे अभिषेक, पुष्पहार अर्पण, तसेच इतर धार्मिक विधी पार पडले. यावेळी जिजाऊंच्या जीवनकार्याचा आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते..Jijau Jayanti: जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघातर्फे विविध कार्यक्रम.शिवछत्रपतींना घडविणाऱ्या या महान मातेस अभिवादन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली. या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. कीर्तन, पोवाडे, व्याख्याने, तसेच शिव-जिजाऊ जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम गेले आठवडाभर सुरू होते. अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त संघटना तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली.सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक नियंत्रण, वैद्यकीय सुविधा तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक स्वयंसेवी संस्था व तरुणांनी सेवा कार्यात सक्रिय सहभागी झाले होते..Rajmata Jijau : स्वराज्याची प्रेरणा ः राजमाता जिजाबाई.पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनीही मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे भेट देत जिजाऊंना अभिवादन केले. या दौऱ्यात पालकमंत्री पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गातील सिंदखेड राजा इंटरचेंज फेज क्रमांक ७ येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी केली..याप्रसंगी आमदार मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते..वंशजांच्या हस्ते पुतळ्याचे पूजनराजे लखोजीराव जाधव यांच्या वंशजांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे राजवाड्यात पूजन केले. यावेळी बालाजी संस्थानचे वंशज राजे विजयसिंह जाधव, प्रा.गोपाळ राजे,आशिष राजे, सुभाष राजे, आनंद राजे, अभिजित राजे यांच्यासह किनगाव राजा, उमरद, सिंदखेड राजा,देऊळगाव राजा, मेहुणा राजा,आडगाव राजा येथील वंशज सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.