Nashik News: अतिवृष्टी, संततधार पाऊस व त्यानंतर कापणी योग्य धान पिकांवर परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान सोसत आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांकडे असून, शेतकरी सध्या आनंदी दिसत आहे. थंडीचा जोर वाढला आहे. परिणामी, रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे..रब्बी हंगामात विविध कडधान्यांची पेरणी केलेली पिके थंडी व पोषक वातावरणामुळे बहरले असून, डौलदार दिसायला लागली आहेत.यंदा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा, गहू, मका, ज्वारी या पिकांचा पेरा केला आहे. यात हरभऱ्याचा पेरा अधिक आहे. सध्या थंडी असल्याने पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बीतील पिके जोमात आली आहेत. चांगले उत्पादन पदरी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे..Rabi Crop Insurance: परभणीत रब्बीतील ४६.५१ टक्के क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण.या परिसरातील शेती कोरडवाहू म्हणून ओळखली जाते. जलसिंचनाची पुरेशी सोय नसल्याने बारमाही पिके न घेता कमी पाण्यावर व कमी कालावधीत येणारी पिके शेतकरी घेतात.यावर्षी सुरवातीपासूनच या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर पिकांचे नुकसान झाले. पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने त्याचा लाभ रब्बी हंगामासाठी झाला आहे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला पसंती दर्शविली आहे. .हरभऱ्यापाठोपाठ गव्हाचा पेरा झाला आहे. गहू, हरभरा ही पिके जोमात आली असताना गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली. आता थंडीचा जोर वाढल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमाने होत आहे. थंडीचे वातावरण रब्बी पिकांसाठी पोषक आहे. सध्या हरभरा फुलात आहे. परंतु धुक्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची भीती नाकारता येत नाही..Rabi Crop Growth: रब्बी पीक क्षेत्रात जवळपास ३ टक्के वाढ, गव्हाचे पीक जोमात, विक्रमी उत्पादन शक्य.या वर्षी शेतकऱ्यांसमोर एकापाठोपाठ एक संकट उभे राहत आहे. खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. रब्बी हंगामात हरभरा पिकाला मर रोग लागला, सतत ढगाळ वातावरणामुळे पिकांना पोषक वातावरण तयार होत नव्हते. सध्या थंडीमुळे पिके जोमात आहेत. अधूनमधून धुके येत आहे.बाजारात मालाला योग्य भाव मिळत नाही. कष्टाने कमावलेले पीक कवडीमोल भावात विकावे लागत आहे.- बालाजी येळापुरे, शेतकरी.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यात व कमी कालावधीत येणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. सध्या हरभरा फुले, घाटे या स्थितीत आहे. गहू पोटऱ्यात आहे. थंडीमुळे पिके जोमात दिसत आहेत. उत्पन्न चांगले मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.- विश्वनाथ कोनाळे, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.