Dharashiv News: यंदाचा ऊस गाळप हंगाम म्हणजे धाराशिवच्या साखर कारखानदारांसाठी जणू ‘टी-२०’ मॅच ठरत आहे. पावसाची दमदार फटकेबाजी आणि हार्वेस्टरची ‘पिच’वर मिळालेली साथ यामुळे गाळपाची ‘धावसंख्या’ सुसाट सुटली आहे. .अवघ्या दोन ते अडीच महिन्यांच्या ‘पॉवर प्ले’मध्येच जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ४१ लाख ४५ हजार ६६९ टनांचा टप्पा गाठून गेल्या वर्षीचा एकूण गाळपाचा विक्रम अक्षरशः धुऊन काढला आहे. आता हा आकडा ५० लाख टनांच्या (अर्धशतकाच्या) उंबरठ्यावर असून, वाढलेल्या साखर उताऱ्यामुळे कारखान्यांच्या धावफलकावर २९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झळकत आहे..Sugarcane Crushing Season: सोलापूर विभागात दीड कोटी मे.टन उसाचे गाळप.मागील वर्षी पूर्ण गाळप हंगामात २७ लाख टनांवर उसाचे गाळप झाले होते. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत झालेले गाळप १४ लाख टनांनी अधिक आहे. गाळप हंगाम अजून महिना-दीड महिना चालणार असल्याने त्यात आणखी मोठी वाढ होणार आहे. तीन महिन्यांत गुरुवारअखेर (ता. २२) जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी ४१ लाख ४५ हजार ६६९ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून २९ लाख ८२ हजार ९६० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे..एकूण साखर उतारा ७.२ टक्के इतका आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत सुमारे ११ लाख ६० हजार क्विंटल साखरेचे जादा उत्पादन हाती आले आहे. हंगाम आणखी दीड महिना चालण्याची शक्यता असल्याने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात यंदा विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे..मागील वर्षी जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी सुमारे २७ लाख १२ हजार ५९४ टन उसाचे गाळप केले होते. त्यातून १८ लाख १८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. हा टप्पा यंदा सुरू झालेल्या १४ साखर कारखान्यांनी पहिल्या दोन महिन्यांतच ओलांडला होता. सहा सहकारी आणि आठ खासगी कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. .Sugarcane Crushing Season: नांदेड विभागात ऊस गाळपात खासगी कारखान्यांची आघाडी.चौदांपैकी सहा सहकारी कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता २२ हजार २५० टन इतकी आहे. या कारखान्यांनी गुरुवारअखेर १४ लाख ६८ हजार ९५४ टन उसाचे गाळप करीत १० लाख ५९ हजार ६१० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्यांचा साखर उतारा ७.२१ टक्के आला आहे..तर आठ खासगी कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ३१ हजार ७५० टन आहे. या कारखान्यांनी २६ लाख ७६ हजार ७१५ टन उसाचे गाळप करून १९ लाख २३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा सरासरी उतारा ७.१९ टक्के आला आहे. जिल्ह्याची दैनंदिन एकूण ऊस गाळप क्षमता ५४ हजार टन आहे..‘नॅचरल’ ठरणार ‘मॅन ऑफ द मॅच’जिल्ह्यातील या गाळपाच्या ‘मॅच’मध्ये रांजनीचा नॅचरल शुगर कारखाना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, पाच लाख ८३ हजार ७८० टनांच्या वैयक्तिक धावसंख्येसह तो ‘मॅन ऑफ द मॅच’चा प्रबळ दावेदार ठरला आहे. या शर्यतीत इतर कारखान्यांनीही चांगली फटकेबाजी केली असून, ४ लाख ७४ हजार ५३० टनांसह इडा जवळा येथील आयन मल्टिट्रेड कारखाना ‘दुसऱ्या’स्थानी (रनर-अप) आहे. .तर समुद्राळ येथील क्वीनर्जी इंडस्ट्रीजने ४ लाख ९ हजार ७५० टनांची खेळी करत ‘तिसरी’ पोझिशन पटकावली आहे. दुसरीकडे, इंदापूरच्या नरसिंह सहकारी साखर कारखान्याचा धाववेग सध्या तरी मंदावलेला दिसत असून, तो या स्पर्धेत तळाला आहे. एकूणच, जिल्ह्याच्या या साखर खेळात नॅचरल शुगरने आपली ‘कॅप्टन्सी’ सिद्ध केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.