Vasanatdada Patil
Vasanatdada Patil Agrowon

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याला शेतकऱ्यांची नस बरोबर सापडली होती...

महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला हा नेता कायम गावाकडचा माणूस म्हणून जगला. पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. दादांचं शिक्षण कमी होते पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था काढण्याचा मार्ग त्यांनीच दाखवला.

एकेकाळी खेड्यापाड्यातील मुलांना चौथीनंतर शाळा शिकणं म्हणजे संकट वाटायचं... दहा-दहा किलोमीटरची पायपीट करुन सातवीपर्यंत शाळा शिकून नंतर कुठेतरी नोकरी धरायची असा क्रम असायचा... बऱ्याच जणांचं शिक्षण (Education) अर्ध्यातून सुटायचं... ग्रामीण भागातलं शिक्षणाचं चित्र कालांतरानं बदललं. खेड्यापाड्यातली पोरं इंजिनियरिंगचं (Engineering) शिक्षण घेऊन देश-परदेशात जाऊ लागली. ही सगळी देण आहे ती वसंतदादा पाटील (Vasant Dada Patil) यांची.

महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचा मुख्यमंत्री राहिलेला हा नेता कायम  गावाकडचा माणूस म्हणून जगला.  पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. दादांचं शिक्षण कमी होते पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था काढण्याचा मार्ग त्यांनीच दाखवला. विनाअनुदानित तत्त्वावर देशात पहिल्यांदा इंजियनरिंग, मेडिकल कॉलेजेस काढण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. दादांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र आज शिक्षण, सहकार, शेती क्षेत्रात अग्रेसर आहे. सहकार, शेती, शिक्षण क्षेत्राला निर्णायक वळण देणाऱ्या वसंतदादा पाटील यांची जन्मभूमी सांगली. वसंतदादांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे स्वप्न उराशी बाळगलं होतं त्या स्वप्नांचा केंद्रबिंदू हा ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस होता.

शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याला वेगळ्या मार्गाने नेल्याशिवाय शेती व्यवसायाचा विकास होणार नाही, शेतीच्या विकासासाठी पाण्याचा नियोजन केल्याशिवाय विकास साध्य होणार नाही आणि शेतकऱ्याचा अर्थकारण सुधारल्याशिवाय ग्रामीण विकास होणार नाही या वास्तवाचं भान वसंतदादांनी सदैव ठेवलं. ते भान जतन करताना जणू एक  मोहीम हाती घेतली होती. आपल्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक माणसावर प्रेम करत, त्याला विश्वासात घेत कार्यासाठी प्रेरणा देण्याची हातोटी त्यांनी संपादन केली होती. केवळ कायदा करून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही त्यासाठी शेतकऱ्याचा सहभाग हवा असा दादांचा आग्रह होता. 

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे वसंतदादा पाटलांना आपला पहिला राजकीय गुरु मानायचे. ते एके ठिकाणी सांगतात, ``दादा हे माझे राजकीय दैवत! बालपणी गरिबी आणि संकटांशी माझा सामना सुरू असताना सांगली जिल्ह्यात दादांनी विकासाची चळवळ जोमदारपणे चालविली होती. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून आपल्या भागाचा विकास कसा करायचा असतो, हे दादा उभ्या महाराष्ट्राला दाखवत होते.

Vasanatdada Patil
Vasant Co-operative Sugar Factory : ‘वसंत’च्या गैरव्यवहाराची स्थगित चौकशी पुन्हा सुरु

````त्या काळात दादांच्या माणुसकीचे आणि दिलदारपणाचे अनेक किस्से ऐकत मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे एकप्रकारे लहानपणीच माझ्यावर दादांच्या समाजिक, राजकीय कार्यानी संस्कार घडविला. त्याचा उपयोग मला आयुष्यभर होतो आहे. त्यांच्या सहवासातील अनेक घटना, घडामोडींनी मला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकविले.``ग्रामीण भागातल्या लोकांशी नाळ जोडल्याशिवाय राजकारण शक्य नाही असा दादांच मत होतं.

आर. आर. पाटलांनी याविषयीचा एक किस्सा सांगितला होता. एकदा एका कार्यक्रमासाठी वसंतदादा तासगावहून विट्याला निघाले होते. त्यावेळी मोटारगाडीत त्यांच्या सोबत आर. आर. पाटील होते. प्रवासात गप्पांबरोबरच दादांचं लक्ष शेतीवर होतं. कोणत्या शेतात कोणते पीक आहे, त्याची वाढ कशी आहे या सगळ्यांबद्दल त्यांचं निरीक्षण सतत चालूच असायचं.

त्या प्रवासात बोलता बोलता दादांनी एका शेताकडे बोट दाखवल आणि म्हणाले नारळाची झाडं दिसणारं ते शेत कोणाचं आहे ?आर. आर. पाटलांनी अंदाजाने नाव ठोकून दिलं. पण ते नाव चुकीचं निघालं. दादांनी मात्र ज्याचं शेत होतं त्याचं नाव तर सांगितलं शिवाय शेतीचे क्षेत्रफळ किती ते सुद्धा सांगितल. आर. आर. पाटलांना आश्चर्य वाटलं आणि आपण चुकीचं नाव सांगितलं त्याबद्दल खेदही वाटला. त्यावेळी दादा त्यांना म्हणाले होते की, संपर्क कमी पडतोय.. भरपूर फिरा त्याशिवाय माणसं आणि आपल्या भागाच्या अडचणी समजणार नाहीत...

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com