Hingoli News: कुरकुमीनचे प्रमाण जास्त असलेले तसेच सरस उत्पादकता असलेले हळद पिकाचे वाण विकसित केले जातील. शेतकऱ्यांना शुद्ध, निरोगी बेण्याचा पुरवठा केला जाईल. संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी आवश्यक संशोधनावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले..हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राची तृतीय वार्षिक सर्वसाधरण सभा व जिल्हास्तरीय हळद उत्पादक शेतकरी कार्यशाळेत सोमवारी (ता. ८) श्री. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा हळद संशोधन केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम.Turmeric Variety : हळदीच्या ३३ वाणांची संशोधन प्रात्यक्षिके.अशासकीय सदस्य लक्ष्मीनारायण मुरक्या, संभाजी सिद्धेवार, सदाशिव पुंड, शिवाजी काकडे, रीतेश जुजाराव, सुनंदा पौळ, प्रतीक्षा पतंगे, मन्मथ सिद्धेवार, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, निधी गौतम, सनदी लेखापाल जीवन लाभशेटवार, तंत्रअधिकारी रमेश देशमुख, तज्ज्ञ मार्गदर्शक तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे (वसमत), के. एम. जाधव (कळमनुरी) आदी उपस्थित होते..श्री. पाटील म्हणाले, की हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपये निधी मंजूर असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे काम सुरू होण्यास विलंब लागला. सातशे कोटी रुपये मंजूर निधी आठ महिन्यांपासून मिळत नाही..Turmeric Variety : कमी कालावधीच्या वायगाव हळदीचा मिळाला पर्याय.हळद उत्पादन घेणारा प्रमुख जिल्हा असला तरी येथे मोठ्या प्रक्रिया उद्योगाची वानवा आहे. श्री. गुप्ता म्हणाले, की हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीला दिशा मिळेल. हळद साठवणूक, विक्री, प्रक्रिया व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. .अंजली रमेश म्हणाल्या, की हळदीवर आधारित उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटांना एकत्र करून टरमरेक्स ही संस्था स्थापन केली जात आहे. त्यामुळे हळद उत्पादनांचे प्रमाणिकरण होईल. .Top 5 Turmeric Varieties: हळदीच्या उत्पादन वाढीसाठी कोणत्या प्रकारची वाणं फायदेशीर ठरतात?.प्रास्तविकात श्री. कदम म्हणाले, की या संशोधन केंद्राने आजवर कमी संसाधनांच्या आधारे उल्लेखनीय कार्य केले आहे. मनुष्यबळाची उपलब्धता झाल्यास संशोधन कार्यास गती प्राप्त होईल. १०० कोटी रुपये निधीपैकी ७४ कोटी रुपये प्राप्त असून त्यापैकी ६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. .ओळंबे म्हणाले, की कीड-रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बेणे बदल करावा. उत्पादन खर्च कमी करावा. निर्यातक्षम उत्पादनासाठी काटेकोर व्यवस्थापन करावे. या वेळी राज्य शासन पुरस्कारप्राप्त तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधि या वेळी उपस्थित होते..रेडीएशन प्लांट लवकरच सुरू करणार; पाटीलहेमंत पाटील म्हणाले, की हळद शिजविताना होणारे नुकसान टाळण्यासाठी ओल्या हळदीपासून हळकुंड निर्मितीसाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. रेडीएशन प्लॅन्ट लवकरच सुरू केला जाईल. वसमत हळद जीआय नामांकनामुळे जगभरात ओळख निर्माण होईल. युरोप, अमेरिकेच्या बाजारपेठेत हळदीला चांगले दर मिळतील. भेंडेगाव येथे लॉजिस्टिक पार्कची उभारणी केली जाईल. रोजगारनिर्मिती होईल. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.