Heat Stress in Animals: सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथे गेल्या काही दिवसांत काही शेळ्या दगावल्याच्या घटनेने गाव परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली. .जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सावित्री तमन्नागौड रवी पाटील यांच्या उपस्थितीत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी संबंधित पशुपालकांची भेट घेतली. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पशुपालकांकडून शेळ्यांच्या आजाराची लक्षणे, मृत्यू होण्यापूर्वीची स्थिती, खाद्य-पाण्याची व्यवस्था, वातावरणातील बदल आणि इतर जनावरांची आरोग्यस्थिती याबाबत माहिती घेतली..Maharashtra Farmer Scheme: ५० शेळ्या, ५ बोकडांसाठी ८.५ लाखांपर्यंत अनुदान! ग्रामीण शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती.तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बाबासाहेब गुंजाटे, डॉ. सुहास सलगर, डॉ. स्वप्निल सोनार, डॉ. कुणाल कांबळे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते..Goat and Sheep Disease Prevention : शेळ्या, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन.पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. थोरे यांनी सांगितले की, सध्या गावातील इतर जनावरांमध्ये संसर्गाची ठळक लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्क राहणे आवश्यक आहे..वाढते तापमान, उष्माघात, पाण्याची कमतरता, आहारातील बदल किंवा इतर कारणांमुळेही जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.