Livestock Healthcare: ‘‘पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पशुपालकांना वेळेत सेवा द्यावी, कामात हलगर्जीपणा करू नये,’’ असे आदेश सभापती सावित्री रवी पाटील यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची बैठक मंगळवारी (ता. ५) सभापतींच्या दालनात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील होत्या. .या वेळी सदस्यांनी काही ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दवाखान्यात वेळेत उपस्थित राहत नाहीत, फोन उचलत नाही, अशा तक्रारी केल्या. याची दखल घेत त्यांनी पशुपालकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा दिली पाहिजे, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले.या वेळी उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, सदस्य जयराज पाटील, प्रशांत अवधूत, सरदार पाटील, जगन्नाथ मोटे, शोभा खोत, धैर्यशील थोरात, दत्तात्रय पाटील, सिंधूताई पाटील उपस्थित होत्या..Aadarsh Setu Kendra: प्रत्येक तालुक्यात आदर्श सेतू केंद्र उभारणार.पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. पशुपालकांना सेवा उपलब्ध करताना अडचण येत आहे. त्यामुळे नियमित अधिकारी, कर्मचारी उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत कंत्राटी पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश सभापती रवी पाटील यांनी दिले..Agriculture Officer Retirement: नाशिक ‘झेडपी’चे कृषी विकास अधिकारी शेवाळे सेवानिवृत्त.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शंभर एकदिवसीय कुक्कुट पिले गट वाटप योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील अनेक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासासाठी इमारत नाही. त्यामुळे मुख्यालयात राहण्यास अडचणी येत आहेत. या बाबत निधी उपलब्ध करावा, तसेच अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची ऑनलाइन हजेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली..‘पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करा’जयराज पाटील म्हणाले, ‘‘अनेक पशुवैद्यकीय अधिकारी चांगले काम करतात. उत्तम सेवा देतात. त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. वर्षात चांगले काम करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करा.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.