Parbhani News: गोदावरीच्या उसाव्यामुळे (बॅकवॉटर) आमच्या कपाशी, सोयाबीन, मुगाची राख झाली. विहीर गाळाने भरली. त्यात मोटार (कृषिपंप) फसली. आखाड्यावर पाणी शिरले. शेतीची इखण, अवजारं, बाजा, अंथरूण-पांघरूण वाहून गेली. थैल्यांतील खत विरघळून गेला. लई मेहनत केली व्हती. पण मागच्या सालाप्रमाण औंदाबी आमच्या पदरात एका रुपयाबी आमदानी पडली नाही हो धसाडी (ता. परभणी) येथील छबुबाई सदाशिव शिंदे या दांपत्याने शेंडा ते बूड बोंडे लगडलेली कुजून पऱ्हाटी झालेले कपाशीचे पीक उपटून टाकलेल्या शेतामध्ये टाहो फोडला. .यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या मॉन्सून कालावधीत परभणी तालुक्यात सरासरी ८११ मिमी अपेक्षित असताना ८९७.५ मिमी (११०.७ टक्के) पाऊस झाला. पेडगाव, जांब, दैठणा या मंडलांत सरासरीहून कमी तर परभणी शहर, परभणी ग्रामीण, पिंगळी, झरी, टाकळी कुंभकर्ण, सिंगणापूर मंडलात सरासरीहून अधिक पाऊस झाला. परभणी ग्रामीण, पिंगळी, झरी मंडलांनी १००० मिमीचा टप्पा पार केला. सर्वच मंडलांत ३ ते ४ वेळा अतिवृष्टी झाली..Maharashtra Flood : असंवेदनशीलतेचा कळस.ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे पेडगाव मंडलातील उरल्या सुरल्या पिकांची नासाडी झाली. पूर्णा तालुक्यात सरासरी ८०७ मिमी पाऊस अपेक्षित असताना सर्व ६ मंडलांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. पूर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्वर, चुडावा मंडलात १००० मिमीपेक्षा जास्त, तर कावलगाव मंडलात कमी पाऊस झाला. एकूण सरासरी १२४०.१ मिमी पाऊस झालेल्या ताडकळस मंडलात अनेकदा ढगफुटी सदृश पाऊस झाला. सर्वच मंडलामध्ये ४ ते ५ वेळा अतिवृष्टीची नोंद झाली..उसाव्यामुळे दरवर्षी आमदानी नाही लागत हाती...परभणी तालुक्यात यंदा खरिपाची ९३ हजार १०६ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयाबीन ५६ हजार ६६६ हेक्टर, कपाशी ३० हजार ७३३ हेक्टर, तूर ४ हजार ८४५ हेक्टर ही प्रमुख पिके आहेत. गोदावरीच्या पुराचा साळापुरी, ब्रह्मपुरी, अंगलगाव, धसाडी, दुधना पुराचा कुंभारी, मांडवा, डिग्रस, झरी, खानापूर, जलालपूर, सनपुरी, करडगाव, हिंगला, धारणगाव, साटला, समसापूर, मांगणगाव, धार, मुरुंबा, साबा आदी पूर्णा नदी काठच्या नांदगाव, आलापूर पांढरी, रहाटी आदी गावांतील पिके वाया गेली..Maharashtra Flood Relief : अस्मानी संकटात सुलतानी बनवेगिरी.पाच किलोमीटरवरील गोदावरी नदीचा उसवा (बॅकवॉटर) इंद्रायणी नदीमार्गे दैठणा गावाच्या पायथ्याला येऊन धडकले पिकांच्या उत्पादनावर पाणी फिरले आहे. दैठणा येथील रामेश्वर कच्छवे यांच्या चिकू बागेतील दीड एकर सोयाबीन इंद्रायणी नदीच्या पुरात चार दिवस बुडाले. दत्तराव भरतराव कच्छवे यांची गावाशेजारी परभणी-गंगाखेड राष्ट्रीय मार्गालगत तीन एकर जमीन आहे. परंतु पडणाऱ्या पावसाचे तसेच गावातून वाहून येणारे पाणी नदीला न मिळता. शेतात साचून राहते..अजूनही फूट दीड फूट पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरिपाचे उत्पन्न बुडाले. रब्बीच्या पेरणीस उशीर होणार आहे. धसाडी येथील छबुबाई सदाशिव शिंदे यांचे ११ एकर जमीन ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी आहे. अर्धा किलोमीटरवरील गोदावरी नदीचा उसावा ओढ्याद्वारे शिंदे यांच्या दोन्ही बाजूच्या ७ एकरांवरील जमीवरील कापूस, सोयाबीन, चारा, ऊस पिकामध्ये तब्बल १५ दिवस पाण्यात बुडाली होती. ६० ते ८० बोंडे लागली होती. दीड लाखाचा कापूस झाला असता. कबड्याची गंजी पाण्यात बुडाली होती. गायई, बैल, म्हशी चिपाडाला तोंडलावंना झालीय. .आखाड्यावरील निवाऱ्यामध्ये उसाला देण्यासाठी आणलेला १०ः२६ः२६ आणि युरियाच्या १५ थैल्यातील खताच जागीच पाणी झाले. धरणामुळे कुणाचा फायदा होत असेल. पण आमच्या खरिपातील पिकांचे मात्र गोदावरीला पूर आला की सदाबी वाटोळं होत आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीतील अतिवृष्टीमुळे परभणी तालुक्यातील ४८ गावांतील ३१ हजार ६०३ शेतकऱ्यांच्या १९ हजार १३६ हेक्टरवरील पीकनुकसानीपोटी १६ कोटी २६ लाख ६५ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे..सप्टेंबर अतिवृष्टी, पूर पीक नुकसान स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्रपरभणी १३० ८४८७५ ७५४८४पूर्णा ९४ ५७७५४ १९६६९.परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाची उंची वाढविली. परंतु पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या काढल्या नसल्यामुळे पिकांमध्ये पाणी साचत आहे. यंदा इंद्रायणी नदीच्या पुरामुळे झाले. त्यापेक्षा रस्त्यावरून थेट शेतात येणाऱ्या पाण्यामुळे अधिक वाटोळं झालं. तीन एकरांवरील सोयाबीन जागेवरच जिरून गेले.दत्तराव कच्छवे, दैठणा, ता. परभणी.आमच्या भागात पहिल्यापासूनच पावसाचं प्रमाण जास्त राहिले. उघडीप दिल्यावर चार एकरांतील सोयाबीन काढले. परंतु समदं डागील झालं आहे. व्यापारी भाव पाडून मागत आहेत. आमदानी घटली. भावपण कमी मिळत असल्यामुळे दुहेरी फटाका बसला.श्रीनिवास काळे, धानोरा काळे, ता. पूर्णा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.