Nashik News: इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीने ‘आदर्श महिला स्नेही व बालस्नेही ग्रामपंचायत’ म्हणून राज्यात एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि ‘ॲनिमियामुक्त गाव’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच, महिलांना मालमत्तेत हक्क मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. .गाव महिला, बालिका व किशोरवयीन मुलींसाठी सुरक्षित, समावेशक व विकासाभिमुख वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. महिला सक्षम झाल्यास कुटुंब, समाज व गावाचा सर्वांगीण विकास होतो या भूमिकेतून ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले असून ते निरंतर सुरू आहेत. .Women Empowerment: महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिक गतीने काम करा .ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर, माजी सरपंच व बचत गट प्रमुख मालन वाकचौरे, आशासेविका विजया जाधव, बचत गट सखी ज्योती भगत, समूह आरोग्य अधिकारी डॉ. दीपिका मोरे, सोबतीला आरोग्य सेविका नूतन शिंदे, शिक्षिका रंजना महाजन, अंगणवाडी सेविका सुनीता शिंदे, कल्पना भगत, राजूबाई कुंदे, मदतनीस सुनीता कुंदे, सुजाता झनकर, अध्यक्षा योगिता वाकचौरे, सचिव प्रिया झनकर आदींनी ग्रामविकास व महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने काम हाती घेऊन विकासाला गती दिली..जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, वर्षा फडोळ, प्रतिभा संगमनेरे, गटविकास अधिकारी महेश वळवी, विस्ताराधिकारी पडवी, प्रशासक साहेबराव देशमुख यांचे ग्रामपंचायतीला मार्गदर्शन मिळत आहे. संपूर्ण गावातील महिला एकत्र आल्याने समृद्ध पंचायतराज अभियानासह महिला आणि बाल स्नेही ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आली. महिला सक्षमीकरण व बळकटीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी गावात ५० हून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे..Women Empowerment: डाळ मिल व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल.शेती, रोजगारनिर्मितीसह पर्यावरण संवर्धनबचत गट महिलांना रोजगार म्हणून ‘माझी वसुंधरा’ अभियान बक्षीस रकमेअंतर्गत वृक्ष लागवड व संगोपन, रोपवाटिका संगोपन अशी कामे देण्यात आली. यासह महिलांना परसबाग लागवड व गांडूळ खत प्रकल्प प्रशिक्षण देण्यात आले. तर एक पेड मा के नाम उपक्रम व महिला मेळावा घेण्यात आला. नाशिक जिल्हा परिषदेकडून नवचेतना अभियानाअंतर्गत एकल महिला पुनर्विवाह वधू-वर परिचय मेळाव्यासाठी ग्रामपंचायत पिंपळगाव डुकरा येथे आयोजित करण्यात आला व जनजागृती करण्यात आली. सौभाग्याचे शपथपत्र उपक्रम घेण्यात आला..ठळक कामे अशीॲनिमियामुक्त गावासाठी सर्वजणी प्रयत्नशीलवित्त आयोगाच्या निधीतून बचत गटाच्या महिलांना कर्जवाटप करून व्यवसायास प्रोत्साहनकृषीसह इतर व्यवसायासाठी कर्ज दिल्याने महिलांचे उत्पन्न दुप्पटमहिला सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून हेल्पलाइन क्रमांक.सर्व महिलांची नावे घराच्या उताऱ्यावरपर्यावरण रक्षणासाठी ५३ सौर पथदीप आणि १० हजार वृक्षलागवडबालविवाह प्रतिबंध जनजागृती अभियानबचत गटासाठी ग्रामसंघ बांधकाम, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधून मुलींसाठी डिस्पोझर मशिनलोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारेनिर्मिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.