Navi Mumbai News: पनवेल तालुक्यातील आदिवासी शेतकरी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ''प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'' ही उक्ती खरी करून दाखवली आहे. ईशान्य फाउंडेशन आणि दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मदतीने सीएसआर प्रकल्पांतर्गत २०१३ पासून पनवेल तालुक्यातील २८ गावे व ११ पाड्यांतील शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीला फळबाग आणि भाजीपाला उत्पादनात रूपांतरित केले जात आहे..प्रकल्पात मृद व जलसंधारणाचे प्रशिक्षण, ठिबक सिंचन, उच्च घनतेची लागवड (पाच गुंठ्यात ५० केशर आंब्याची रोपे) आणि अर्धा एकरवर आंबा फळबाग लागवडीसाठी मदत दिली जाते..Mango Farming: आंबा मोहोराचे भुरी आणि तुडतुड्यापासून संरक्षण कसे कराल?.आतापर्यंत ४३० शेतकऱ्यांकडे आंबा फळबाग विकसित झाली. २०२४-२५ मध्ये ३८,८३९ किलो आंबा उत्पादनातून ३४.५६ लाख रुपये उत्पन्न मिळाले. ५५० शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी सहाय्य ; सरासरी वार्षिक उत्पन्न ७५,८३३ पर्यंत वाढ, ७७३.२५एकर क्षेत्रावर शाश्वत शेती सुरू झाली असून ७३ टक्के कुटुंबांचे हंगामी स्थलांतर कमी झाले किंवा थांबवले आहे..Mango Flowering: आंबा मोहर बाहेर पडण्यासाठी वातावरण अनुकूल .वाडी उपक्रमाने तंत्रज्ञानाधारित शेती आणि हाय-डेन्सिटी प्लांटेशनसारख्या आधुनिक पद्धतींच्या माध्यमातून कुटुंबांपर्यंत बदल घडवून आणता येतो, हे प्रभावीपणे दाखवून दिले आहे, असे दीपक फर्टिलायझर्सचे नरेश पिनिसिटी यांनी सांगितले..प्रेरणादायी बदलभल्याचीवाडी येथील चंद्रा आणि विकास निरगुडा यांनी पाणी संसाधन विकासामुळे विक्रमी ५७ हजार ५०० रुपये हंगामी उत्पन्न मिळवले. तर गाढेश्वर येथील महादी आणि दत्तू दुमणे यांना आंबा आणि भाजीपाला विक्रीतून एकूण ७८ हजार ९२० रुपये उत्पन्न मिळाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.