Chakan News: चाकण, काळूस, वाकी, भोसे, रासे, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, बहुळ, कडाचीवाडी, खराबवाडी, सोळू, धानोरे, कोयाळी, वडगाव घेणंद, मरकळ आदी गावांत ॲस्टरच्या फूलशेतीचे प्रमाण गेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात होते. मात्र, सध्या या फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झालेला दिसून येत आहे. वारंवार होणाऱ्या बाजाभावातील घसरणीमुळे तसेच अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे कल वाढल्याने शेतकऱ्यांनी ॲस्टर फुलविण्याकडे पाठ फिरविली आहे..काळूस, वाकी बुद्रुक या भागाला ॲस्टरच्या फुलांचे आगार म्हटले जायचे. येथील परिसरातून सुमारे पन्नास ट्रक मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी फुले विक्रीसाठी घेऊन जायचे. त्यावेळी फुलांच्या हुंडेकरी होत्या. त्या काळाच्या ओघात बंद झाल्या. हुंडेकऱ्यांमार्फत फुले विक्रीसाठी मुंबईतील बाजारांत ट्रकमधून दररोज फुले पाठवली जायची. सध्या बोटावर मोजता येणारे शेतकरी ॲस्टरच्या फुलांची शेती करतात..Aster Flower Farming: रंगबिरंगी आकर्षक ॲस्टरची लागवड.ॲस्टरच्या फुलांना पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही फुले गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सणाला अगदी दोनशे रुपये प्रतिकिलोने बाजारात विकली गेली. या फुलांच्या काढणीचा मोठा खर्च असतो. मजुराचा खर्च त्यामुळे ही शेती कमी प्रमाणात होत आहे. रोपांच्या लावणी नंतर दीड ते दोन महिन्यात ही फुले काढणीस येतात. अडीच, तीन महिने फुलांचा हंगाम चालतो, असे शेतकरी सुभाष पवळे,आकाश पवळे, गणेश खैरे यांनी सांगितले.Aster Flower Farming: खेड तालुक्यात ॲस्टरची फुलशेती कोमेजली!.यामुळे फूलशेतीत घटऔद्योगिक वसाहत या परिसरात आली शेतांचे प्लॉटिंगउत्पन्न कमी मिळू लागल्याने शेतकऱ्यांची पाठऊस, कांद्यासह इतर पिकांच्या क्षेत्रात वाढलेराज्यभरातून आवक वाढत असल्याने बाजाराभावत होणारी घट.बरेचशे शेतकरी काळूस भागातील ही फूलशेती करायचे. वीस, पंचवीस वर्षांपूर्वी ही फुले माळरानावर मोठ्या प्रमाणात केली जायची. परंतु ही फुलशेती पूर्णपणे गायब झालेली आहे. जिन्याचे लाल रंगाचे भडक फूल आता दिसतच नाही. ॲस्टरची फूल शेती संपत चालली आहे.- बबन खांडेभराड, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.