Pandharpur News: उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात करण्यात येणाऱ्या विसर्गात शनिवारी (ता. २३) लक्षणीय घट झाल्यामुळे पंढरपूर शहरावर आलेला महापुराचा धोका टळला आहे. चंद्रभागेची पाणीपातळी झपाट्याने कमी होत, असल्याने प्रशासनासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे..परतीच्या पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. वीर धरणातून ५४ हजार क्युसेक तर उजनीतून तब्बल दीड लाख क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले होते. यामुळे चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती आणि पंढरपूर शहरातील अंबाबाई, व्यासनारायण झोपडपट्ट्यांसह सखल भागात पुराचे पाणी शिरले होते..Uttarakhand Flood: उत्तराखंडात अतिवृष्टीचा कहर.सुमारे ३०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. पूरस्थितीमुळे पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता, त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. शहरातील तेरा घाटांवरही पाणी आल्याने भाविकांची गैरसोय झाली. दरम्यान, काल सकाळपासून धरणांतील विसर्गात घट करण्यात आली..त्यानंतर पुन्हा शनिवारी (ता.२३) वीर धरणाचा विसर्ग ६ हजार ५९५ क्युसेकवर आणण्यात आला असून, उजनीचा विसर्गही दुपारी ३५ हजार क्युसेकवर आणण्यात आला आहे. रात्रीपर्यंत विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने सांगितले की, उद्या सकाळपर्यंत चंद्रभागेची पाणीपातळी लक्षणीयरीत्या कमी होईल, असे सांगण्यात आले..Heavy Rain Damage : शिरसगावकसबा गावात ५० लाखांवर नुकसान .शेतीचे मोठे नुकसानपुरामुळे पंढरपूर तालुक्यातील आंबे, पोहरगाव, पिराची कुरोली, शेळवे, शिरढोण, कौठाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस, केळी, भुईमूग, चारा यांसारखी पिके वाहून गेली असून, शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. विशेषतः नवीन लागवड केलेली ऊस पिके नष्ट झाली आहेत..काही भागांत तर जमिनीसुद्धा खरडून गेली आहे. पिराची कुरोली, देगाव, गुरसाळे, देवडे, सांगवी या गावांतील ११ घरांत पुराचे पाणी शिरले असून, या कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले असून, लवकरच संकलित अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.