Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली काही वर्षे न झाल्याने कार्यकर्त्यांना काही देता येत नव्हते. मात्र सत्ताधारी पक्षांनी घाऊक आयात करत कार्यकर्त्यांच्या कोपराला गूळ लावून ठेवला होता. एकदा का निवडणुका लागल्या, की हा गूळ खाता येईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र कोपराचा गूळ दुसऱ्यानेच कुणी तरी नेला आहे.