Kolhapur News: देशातील साखर हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. नोव्हेंबर मध्यअखेर देशात ३२५ साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक १७० साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. त्या खालोखाल उत्तर प्रदेशात ८६, कर्नाटकात ५०, गुजरातेत १४ तर इतर राज्यात मिळून १९ साखर कारखाने सुरू झाले आहेत..राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, देशात नव्या हंगामाची १०.५० लाख टन साखर तयार झाली आहे. या वर्षी मॉन्सूनचा पाऊस लांबला. पावसाचा मुक्काम ऑक्टोबरपर्यंत तर महाराष्ट्रातील काही विभागात नोव्हेंबरपर्यंत वाढला. यामुळे नवीन गाळप हंगाम सुरू होण्यास विलंब झाला आहे. त्यात भर म्हणून कर्नाटक आणि महाराष्ट्रात ऊस दराच्या आंदोलनामुळे संपूर्ण भारतात ऊस गाळप आणि नवीन साखर उत्पादनाची गती मंदावली आहे..Sugar Industry: नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांना गाळप परवाना .त्यात लक्षणीय घट झाली आहे. १२८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ९१ लाख टन ऊस गाळप झाला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत देशातील १४४ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. ७.१० लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील निवडणुकांमुळे प्रत्यक्ष गाळप हंगाम नोव्हेंबर अखेर सुरू झाला होता..महासंघाच्या माहितीनुसार, नवीन गाळप हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी यंदा एकूण नवीन साखर उत्पादन अंदाजे ३५० लाख टन होण्याचाअंदाज आहे. त्यात महाराष्ट्र (१२५टन) , उत्तर प्रदेश (११० लाख टन) आणि कर्नाटक (७० लाख टन) ही राज्ये आघाडीवर असणार आहेत..Maharashtra Sugar Industry: बावीस साखर कारखान्यांना गाळप परवाना नाकारला.याशिवाय इथेनॉल उत्पादनासाठी ३५ लाख टन साखर वळविली जाईल. घरगुती वापरासाठी २९० लाख टन साखरेचा वापर होईल. ओपनिंग स्टॉक ५० लाख टन असल्याने पुढील वर्षासाठी २०-२५ लाख टन विक्री साठी साखर शिल्लक राहील. त्यातील १५ लाख टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. ही साखर जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत निर्यात होण्याची शक्यता आहे..अतिरिक्त १० लाख टन साखर उपलब्ध होणे अपेक्षित आहे. या निर्णयामुळे साखर कारखान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. कारण गेल्या सहा वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री किमतीत काहीही बदल न झाल्यामुळे आणि गेल्या तीन वर्षांपासून इथेनॉल खरेदी किमती न वाढल्यामुळे कारखाने आर्थिक कोंडीत आहेत, असे महासंघाने म्हटले आहे..शेतकऱ्यांच्या उसाला मिळणाऱ्या एफआरपीमध्ये वाढ होणे, त्याला उसाची उच्च किंमत मिळणे हे तार्किकदृष्ट्या योग्य आहे. आम्ही शेतकरी केंद्रित संघटना म्हणून त्याचे पूर्णपणे समर्थन करतो. परंतु त्याच बरोबर उसाच्या वाढत्या किमती लक्षात घेता साखरेची एमएसपी वाढविणे इथेनॉल खरेदी किमतीत वाढ होणे गरजेचे आहे.हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ.साखरेचे किमान विक्री दर हे सध्याच्या कारखाना स्तरावरील विक्री दराच्या पातळीवर निश्चित करणे, इथेनॉल दरात वाढ करणे, साखरेवर आधारित इथेनॉल वाटप वाढवणे, याबाबत आम्ही महासंघाच्या स्तरावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.