Sangli News: उपवळे (ता. शिराळा) परिसरात सात दिवसांपासून गव्यांनी धुडगूस घातला आहे. बुधवारी (ता. ७) मध्यरात्री व गुरुवारी (८) पहाटे पश्चिमेस डोंगरालगत असलेल्या बंबाट्याच्या माळ परिसरातील सहा शेतकऱ्यांच्या दहा एकरांतील हातातोंडाला आलेल्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. पाच-सहा दिवसांपासून नुकसानीची मालिका सुरू असल्याने व बुधवारी रात्री मध्यवर्ती ठिकाणी स्वरांजली संग्राम पाटील या नऊ वर्षीय बालिकेला बिबट्याने हल्ला करून जखमी केले. एकाच रात्रीत दोन घटना घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्या, गव्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे..घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, उपवळे डोंगरापासून काही अंतरावर वसले आहे. पश्चिमेस डोंगरालगत वन विभागाच्या हद्दीला लागूनच बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. बंबाड्याच्या माळावर १५ ते २० गव्यांच्या कळपाचे दहा बारा दिवसांपासून गवत काढणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना निदर्शनास येत आहेत. .Wildlife Crops Damage: नीलगाईंच्या उपद्रवाने उभी पिकांचे नुकसान.बुधवारी रात्री व गुरुवारी पहाटे या गव्यांच्या कळपाने भीमराव कदम (३० गुंठे) पोटरीत आलेला गहू, शंकर आनंदा कदम (८० गुंठे आडसाली ऊस),.Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान .विकास रंगराव पाटील व प्रवीण रंगराव पाटील (७२ गुंठे आडसाली ऊस), शिवाजी कुंडलिक पाटील (१५ गुंठे शाळू), भीमराव बाळकृष्ण पाटीलशाळू (४० गुंठे शाळू) आदींसह दहा एकरांतील विविध पिकांचे नुकसान झाले..ऑक्टोबर २०२५ पासून उपवळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री अनेकदा नागरिकांना दर्शनही झाले. कोणतीही हानी झाली नव्हती. बुधवारी रात्री गावात मध्यवर्ती ठिकाणी स्वरांजली पाटील (वय ९) या बालिकेला बिबट्याने जखमी केले. गव्यांच्या कळपाने दहा एकरातील पिकांचे नुकसान केले. एका रात्रीत दोन घटना घडल्याने भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्या, गव्यांचा बंदोबस्त करावा; अन्यथा ग्रासस्थांसह आंदोलन करणार आहे.- संभाजी पाटील, सरपंच, उपवळे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.