Parbhani News: गरजेपुरता पाऊस पडत राहिल्याने खरिपाची पिकं बहरली होती. सोयाबीनच्या शेंगा निब्बर झाल्या होत्या. कपाशीचे पीक बोंडाने लदबदून गेले होते. चांगल्या आमदानीच्या होईल, समदी देणी फिटतील, असं वाटत होतं. पण मागच्या आठवड्यातील अतिवृष्टी अन् त्याबरोबरच गोदावरीच्या बॅकवॉटरमुळं जलसमाधी मिळालेल्या समद्या पिकांचा कुजून कोळसा झालाय. सांगा आता बँकेचं देणं कसं फेडायचं, अशी चिंता व्यक्त करत गंगाखेड तालुक्यातील सायाळा येथील शेतकरी पाणावलेल्या डोळ्यांनी अन् भकास चेहऱ्यांनी वेदना मांडत होते..गंगाखेड तालुक्याची अवर्षण प्रवण तालुका म्हणून ओळख आहे. दक्षिणेला हरिच्चंद्र बालाघाटच्या डोंगर रांगातील हलकी, बरड जमिनी तर उत्तरेला दक्षिण गंगा गोदावरी नदी काठच्या सुपीक काळ्या कसदार जमिनीतील पिकांना हवा तेवढा पाऊस मिळत गेला. परंतु मंगळवारी (ता. २३) या तालुक्यातील तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. स्थानिक परिसरातील ओढे, नाले, गोदावरीच्या उपनद्यांना पूर आले. त्याच दिवशी जायकवाडी व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला..Crop Damage: पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांचा संताप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांसह आमदारांना शेतकऱ्यांनी घेरलं.गोदावरीला महापूर आला. गोदावरीच्या दोन्ही काठच्या खळी, चिंचटाकळी, मैराळ सावंगी, धारासूर, मुळी, धारखेड, नागठाणा, महातपुरी, आनंदवाडी, भांबरवाडी, दुसलगाव, गंगाखेड, झोला, मसला, पिंपरी या गावांतील पिके पुराच्या पाण्यात बुडाली. गोदावरी नदीपासून दोन अडीच किलोमीटरवरील सायाळा व सुनेगाव या गावांजवळून इंद्रायणी नदी वाहते. गोदावरीच्या महापुरामुळे इंद्रायणीचे पाणी तुंबले. तीन ते चार किलोमीटर मागे येऊन शेतात पसरले आहे..जलसमाधी मिळालेल्या पिकांना सुटली दुर्गंधीइंद्रायणी नदीपासून अर्धा ते एक किलोमीटरच्या त्रिज्येतील जमिनीवरील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांना बॅक वॉटरमध्ये जलसमाधी मिळाली. आठ दिवसानंतर काही भागातील बॅक वॉटरचे पाणी ओसरल्यानंतर कुजून गेलेली कपाशी, सोयाबीन पिके उघडी पडली आहेत. परंतु अजून पाणी असलेल्या शेतातील सोयाबीन कुजून गेले असून दुर्गंधी सुटली आहे. दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावावा जावे लागत आहे..Nashik Flood: नाशिकमध्ये अतिवृष्टीच्या तडाख्यात शिवारांची दुर्दशा.वातीसाठी देखील मिळणार नाही कापूससायाळा येथील जनार्दन सूर्यवंशी यांच्या ३ बंधुंची इंद्रायणी नदीकाठी ६० एकर जमीन आहे. बॅक वॉटरच्या पाण्यात २५ ते ३० एकरवरील कपाशी, सोयाबीन बुडाले. आखाड्यावरील घरात शिरले. अन्नधान्ये, कडबा, चाऱ्याची नासाडी झाली. अवजारे, शेती साहित्यांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून सूर्यवंशी यांनी तत्काळ बैलजोडीसह इतर जित्राबाचा मुक्काम रोकडोबा सातपुते यांच्या गंगाखेड-परभणी राष्ट्रीय महामार्गाजवळील सुरक्षित ठिकाणच्या आखाड्यावर हलविला आहे. बॅक वॉटर ओसरल्यावर जनार्दन यांनी शेताचा वेढा केला. बोंडे लगडलेले उभे कपाशीचे पीक जागीच काळे ठिक्कर पडले. बोंडासह पऱ्हाट्या झालेल्या पाहून त्यांचे अवसान गळून गेले. कपाशीचे एकरी १५ क्विंटलवर उत्पन्न मिळत असते. परंतु यंदा वातीला देखील कापूस मिळणार नाही. कुजलेली पऱ्हाटी, सोयाबीन शेताबाहेर काढून टाकायचा खर्च पदरमोड करून करावा लागणार आहे..पावसाचा जोर कमी झाला असला तरी जायकवाडी धरणाच्या विसर्गामुळे बॅकवॉटरचे संकट कायम आहे. आगामी काळात बॅकवॉटरमुळे असेच नुकसान होत राहिले तर शेती करणे अशक्य आहे. सरकारने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांची बॅक वॉटरच्या संकटातून सुटका करावी. विनाअट कर्जमाफीसह पिके तसेच जमिनीची भरपाई द्यावी, असे सूर्यवंशी म्हणाले.सायाळा येथील रोकडोबा सातपुते म्हणाले, की अकरा एकरावरील हाती आलेली पिके वाया गेलीत. चार लाख रुपयांचे देण झालं आहे. ते कस फेडावं याची चिंता लागली आहे. रब्बीच्या पेरणीसाठी अडचणी येणार आहेत. मदत मिळाली तरी वाफसा झाल्यावर पेरणी करू.खळी येथील ज्ञानोबा भोसले म्हणाले, की औंदा सारख नुकसान आजवर कधीच पाहिल नाही. ऐन काढणीच्यावेळी झालेली नासाडी बघवत नाही. सरकार देऊन देऊन काय देणार आहे. ते किती दिवस पुरणार आहे. आपल्या शेतातल उत्पादनच पुरतं. शेतकऱ्यावर लई वाईट वेळ आली आहे..४० हजारांवर हेक्टरवरील पिकांचा तडाखागंगाखेड तालुक्यातील पाच मंडलांत यंदाच्या खरिपात ५७ हजार ३२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन २६ हजार ८८१ हेक्टर, कपाशी २३ हजार ६७२ हेक्टर, तूर ४ हजार ४२१ हेक्टर पेरा आहे. त्यापैकी सुमारे ४० हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टी तसेच पूर, बॅकवॉटरचा तडाखा बसला आहे. सोयाबीन, कपाशी, तूर ही पिके समूळ नष्ट झाली आहेत..खरीप २०२५ मंडलनिहाय पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)मंडल पेरणी क्षेत्रगंगाखेड १००६६महातपुरी ११३६७माखणी १३७७०राणीसावरगाव १०८०८पिंपळदरी ११३१४.मंडलनिहाय पर्जन्यमान स्थिती मिमीमध्ये (मंगळवारी, ता. ३० पर्यंत)मंडल अपेक्षितपाऊस प्रत्यक्षपाऊस टक्केवारीगंगाखेड ७२५.७ ७८५.३ १०८.२महातपुरी ७२५.३ ७३३.३ १०१.०माखणी ७२५.७ ८७३.४ १२०.४राणीसावरगाव ७२५.७ १०७०.६ १४७.५पिंपळदरी ७२५.७ ९४१.५ १२९.७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.