Solapur News: करमाळा तालुक्यासाठी कुकडीचे रब्बी आवर्तन सुरू झाले आहे. याद्वारे आता लाभक्षेत्रातील पाणीसाठे भरून घेतले जाणार असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे..वीट (ता. करमाळा) येथे कुकडीच्या पाण्याचे पूजन जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, बिभीषण आवटे, अभयसिंह राजेभोसले, सुभाष आवटे, जगदीश निंबाळकर, केशव चोपडे, अशोक राऊत, गणपत ढेरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले..Kukadi Project: रब्बी पिकांसाठी ‘कुकडी’चे आवर्तन सुरू .या वेळी उपविभागीय अभियंता श्रीरंग मेहर उपस्थित होते. आमदार पाटील यांनी सांगितले की, सध्या रब्बीची पिके जोमात असून या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने आपण आवर्तन वेळेत मिळावे ही मागणी कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली होती. .Kukadi Water Project: कुकडी प्रकल्पात २२ टक्के पाणीसाठा.आपल्या मागणीनुसार पाणी करमाळा तालुक्यात दाखल झाले असून करमाळा हद्द २२३ पासून ३५० क्युसेसने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. चालू आवर्तन योग्य नियोजन करून दिले जावे व प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पाणी सोडण्यात यावे..उपविभागीय अभियंता श्रीरंग मेहर, शाखा अभियंता दीपक कवितके, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रतीक गिरी प्रत्यक्ष कार्यस्थळी असलेल्या अडचणी सोडवत आहेत. याशिवाय जर कुठल्या शेतकऱ्यांना आपल्यावर अन्याय होत असेल असे वाटले तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.