Raigad News: ऑलिव्ह रिडले मादी कासव अंडी घालण्यासाठी अनेकदा त्याच समुद्रकिनाऱ्यावर परततात, असे भारतीय वन्यजीव संस्थान यांच्या निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीवर मादी कासव अनेक वर्षे विणीच्या हंगामात येत असून, विणीचा हंगाम साधारणपणे नोव्हेंबर ते मार्चदरम्यान असतो. मात्र, किनाऱ्यावरील असुरक्षितीतेच्या अनुषंगाने ऑलिव्ह रिडले मादी कासव किनाऱ्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे..ऑलिव्ह रिडले कासव रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर येऊन वाळूत साधारण दीड ते दोन फूट खोल खड्डा खणून १०० ते १५० अंडी घालते. अंडी वाळूने झाकून ती पुन्हा समुद्रात निघून जाते ती कायमची. अंडी वाळूत नैसर्गिकरीत्या उबतात, असेही वन्यजीव अभ्यासक सांगतात. .Turtle Nest : चार किनाऱ्यांवर प्रथमच आढळली कासवांची घरटी.अंड्यांच्या उबवणीसाठी लागणारे तापमान वाळूच्या तापमानावर अवलंबून असते, परंतु अनेक वेळा भुकेले श्वान वाळू उकरून अंडी बाहेर काढतात तसेच मानवी वर्दळीमुळे वाळू दबून अंडी फुटण्याचाही धोका असतो. त्यामुळे ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन होणे गरजेचे आहे..Turtle Conservation : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कासवांचे यशस्वी संवर्धन .ऑलिव्ह रिडले कासव मादींना प्रेमाने ‘माहेरवाशिणी’ म्हणतात. मादी अंडी घालण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून नेमकी त्याच किनाऱ्यावर येते, जिथे तिचा स्वतःचा जन्म झाला होता. ज्याप्रमाणे एक मुलगी लग्नानंतर काही काळासाठी आपल्या माहेरी येते..अंड्यांचे संरक्षणश्रीवर्धन, हरिहरेश्वर, मारळ आणि दिवेआगर या किनाऱ्यावर मादी कासव हंगामात विणीसाठी दरवर्षी येसतात. अंड्यांच्या संरक्षणासाठी कांदळवन कक्ष, वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कासव मित्र किनाऱ्यावर रात्रभर गस्त घालतात. वाळूत अंडी सापडल्यास अंड्यांचे संरक्षण करण्यासाठी ती बाहेर काढून बांबूच्या टोपल्याचा वापर करून सुरक्षितरीत्या संगोपन करतात. ४५ ते ६० दिवसांनी अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले नैसर्गिक पद्धतीने, सुरक्षितपणे पाण्याच्या दिशेने सोडण्यात येतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.