Pune News: ठिबक संच खरेदीचे अनुदान राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत मिळण्याकरिता वितरक नोंदणीची अट तूर्त रद्द करा, असे आदेश कृषी विभागाने दिले आहेत. फलोत्पादन संचालनालयाने सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) वितरक नोंदणीचा आग्रह धरू नका, असे कळविले आहे..यामुळे ‘प्रति थेंब अधिक पीक योजने’त २०२४-४५ वर्षाकरिता नोंदणी झालेल्या सूक्ष्म सिंचन कंपन्यांच्या वितरकांची यादी २०२५-२६ या वर्षासाठीदेखील ग्राह्य धरली जाणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी वितरकांना फेरनोंदणी करावी लागते. नोंदणी न केल्यास संबंधित वितरकाकडून सूक्ष्म सिंचन सामुग्री विकत घेतलेल्या शेतकऱ्यांचा अनुदान प्रस्ताव मंजूर केला जात नाही. मात्र, यंदा वितरक नोंदणीच संथगतीने चालू होती..Drip Irrigation: ठिबक सिंचनाची देखभाल आणि व्यवस्थापन.त्यामुळे अनुदान वाटपाबाबत पेच तयार झाला होता. ‘‘शेतकऱ्यांकडून सूक्ष्म सिंचन संच अनुदानासाठी गेल्या आर्थिक वर्षात पाच लाख अर्ज केले आहेत. ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने यातील पहिले २ लाख २६ हजार अर्ज आता अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आलेले आहेत. या अर्जदार शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करीत त्यांनी संच बसवला आहे की नाही, हे तपासावे लागणार आहे..Drip Irrigation Subsidy: ठिबक अनुदानाचे २० हजार अर्ज गायब.परंतु, ते तपासण्यापूर्वी संबंधित वितरकाची नोंदणी अत्यावश्यक असते. यंदा वितरक नोंदणीचे काम अर्धवट झालेले आहे. नोंदणी पूर्ण नसल्यामुळे राज्यभर मोका तपासणीची कामेही रखडली आहेत. परिणामी, अनुदानासाठी पैसा उपलब्ध असूनही वाटता येत नाही. त्यामुळे वितरक नोंदणीची अट स्थगित करण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली..‘एसएओं’कडे प्रमाणपत्र देण्याच्या सूचनासूक्ष्म सिंचन योजनेतील अनुदान वेळेत न वाटले गेल्यास केंद्र शासनाकडून पुढील हप्ता मिळवण्यात अडचणी येण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी ठिबक अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्याच्या सूचना आम्ही क्षेत्रिय कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यातील ठिबकचा दुसरा हप्ता राज्याला लवकरच प्राप्त होईल. परंतु, त्यापूर्वी वितरक नोंदणीचा घोळ मिटवणे आवश्यक आहे. त्यामुळेच ठिबक कंपन्यांनी त्यांच्या वितरकांची नोंदणी प्रमाणपत्रे ‘एसएओं’कडे वेळेत जमा करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.