Nashik News: नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मान्सूनोत्तर पावसाने दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी व मुसळधारेने खरिपातील उरल्यासुरल्या मका, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप कांदा खराब होत आहे. तर रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा रोपवाटिकांचे अतोनात नुकसान आहे. द्राक्ष हंगामावर मोठे संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल आहे. दुसऱ्या दिवशीच्या पावसाने बागलाण, मालेगाव, कळवण, चांदवड, देवळा तालुक्यांना पुन्हा दणका दिला..शनिवारी (ता. २५) सायंकाळनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २६) पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले. यामध्ये बागलाण तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील बागलाण व चांदवड या दोन महसूल मंडलांत अतिवृष्टी नोंदविली गेली. तर सर्वच महसूल मंडलांत पावसाने अडचणीत भर घातली आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर वाढल्याने भात व नागली पिकांचे मोठे नुकसान आहे. कापणी केलेला भात पावसाच्या पाण्यात तरंगत आहे..Banana Crop Damage : पुरानं सगळं वाहून गेलं, पण आमचा आत्मविश्वास नाही....जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे चांदवड, देवळा, येवला, नांदगाव, बागलाण व सिन्नर या तालुक्यांतील खरीप लाल कांद्याचे नुकसान वाढले. या बरोबरच जिल्ह्यात सर्वत्र रब्बी उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे अजूनही शेतामध्ये सोयाबीन आणि मका कापणी बाकी आहे. त्या पिकांना या अतिवृष्टीचा फटका आहे. बहुतांश ठिकाणी कापणी करून शेतात पडलेला मका पावसात भिजला. चाऱ्याचेही नुकसान झाले. याशिवाय लेट खरीप कांदा लागवडी पाण्याखाली गेल्याने बुरशीजन्य रोगामुळे या लागवडींमध्येही मोठे नुकसान समोर येत आहे..Crop Damage : पैठण तालुक्यातील ५४ हजार ९८ हेक्टरवरील कपाशीचे नुकसान.द्राक्ष उत्पादक मोठ्या संकटातसप्टेंबरच्या दुसऱ्या हप्त्यापासून टप्प्याटप्प्याने द्राक्ष उत्पादक पट्ट्यात गोडी बहर छाटण्या सुरू झाल्या होत्या. मात्र सततचा पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे अनेक ठिकाणी ५० टक्क्यांवर बागा फेल गेल्या होत्या. बागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच पुन्हा पावसाने झोडपल्याने उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येत आहे..जवळपास सर्व शेतकऱ्यांचे कांदा बियाणे टाकून झाले होते. या मुसळधार पावसामुळे सर्व कांदा रोपे खराब झाली आहेत. आता शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे.घनश्याम पवार, शेतकरी, नवी बेज, ता. कळवण.गेले तीन दिवस रोज रात्री मुसळधार पाऊस पडला, पावसामुळे उभे कांदा पीक, उन्हाळ कांद्याचे टाकलेले बियाणे खराब झाले. तसेच शेतात उभा असलेला मका, कापलेल्या मक्याचा चारा व कणसे भिजत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शिवाजी पवार, शेतकरी, वाखारी, ता. देवळा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.