विजय सांबरेआमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने गावगाड्यातील विविध जनसमूह व त्यांचे परस्परावलंबी जीवन अनुभवता आले. या सर्व लोकांची उपजीविका निसर्गावर अवलंबून होती. त्यात लहानमोठे शेतकरी होतेच; पण इतरही अनेक समुदाय सभोवताली दिसायचे. शेळ्या-मेंढ्या पाळणारे धनगर, डुक्कर पाळणारे वडार, गाढव पाळणारे कुंभार, अस्वले घेऊन फिरणारे वाघवाले, रानात शिकार करणारे व पाण्यात मासे पकडणारे भिल्ल, शिकारी कुत्रे घेऊन मांजरी, बोके पकडणारे वैदू, नाग गळ्यात घालून फिरणारे गारुडी, घायपाताचे दोर विणणारे मातंग, नदीत होडी चालविणारे तारू-कहार समाजाचे लोक. हे सर्व विवक्षित समाजाचे लोक प्रवरा नदीकाठी नांदत होते..प्रवरा नदीकाठी वसलेले आमचे अश्वी बुद्रुक हे जुन्या बाजारपेठेचे गाव. पूर्वापार सधन मानले जाते. त्यामुळे या गावाची धाटणी पूर्वीपासूनच निमशहरी, ज्याला ‘रुर्बन’ असे म्हणता येईल. बालपणापासून गावगाड्यातील अनेक लोकसमूह आम्हाला जवळून पाहायला मिळाले. आमच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने गावगाड्यातील विविध जनसमूह व त्यांचे परस्परावलंबी जीवन अनुभवता आले..या सर्व लोकांची उपजीविका निसर्गावर अवलंबून आहे, हे नेहमी जाणवत होते. त्यात लहानमोठे शेतकरी होतेच; पण इतरही अनेक समुदाय सभोवताली दिसायचे. शेळ्या-मेंढ्या पाळणारे धनगर, डुक्कर पाळणारे वडार, गाढव पाळणारे कुंभार, अस्वले घेऊन फिरणारे वाघवाले, रानात शिकार करणारे व पाण्यात मासे पकडणारे भिल्ल, शिकारी कुत्रे घेऊन मांजरी, बोके पकडणारे वैदू, नाग गळ्यात घालून फिरणारे गारुडी, घायपाताचे दोर विणणारे मातंग, नदीत होडी चालवणारे तारू-कहार समाजाचे लोक. हे सर्व विवक्षित समाजाचे लोक प्रवरा नदीकाठी नांदत होते..Rural Story: हिरव्यागार शिवारात दाटलेला उमाळा.समग्र पातळीवर महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर कोकणच्या सागरी किनाऱ्यापासून ते गडचिरोलीतील जंगलापर्यंत असे असंख्य जनसमुदाय जल-जंगल-जमीन-जनावरे या नैसर्गिक घटकांवर, म्हणजेच स्थानीय परिसंस्थांवर अवलंबून आहेत. आजही काही प्रमाणात आदिवासी, दलित, भटके, पशुपालक व शेतकरी यांची उपजीविका स्थानिय परिसंस्था म्हणजे सृष्टी-व्यवस्थांवरच अवलंबून आहे. पुढे लोककेंद्री शाश्वत नैसर्गिक व्यवस्थापन या विषयात काम सुरू झाले. समाजशास्र-मानववंशशास्त्र-पुरातत्वशास्त्र-परिसरशास्र-भूगर्भशास्त्र-कृषी व पशुविज्ञान यांचा परस्पर संबंध अभ्यासत गेलो. त्यातून पारंपारिक समाज व्यवस्थेतील बहुरंगी छटा उमजू लागल्या..लोक-सृष्टी व्यवस्थाधारित जीवनशैलीमानवी उत्क्रांतीचा मागोवा घेतला तर नानाविध लोकसमूह स्थानिक सृष्टी व्यवस्थेच्या आधारे कसे तगले, हे कळते. भटक्या अवस्थेतील मानव शिकार करून जगत होता. लाखो वर्षांच्या कालखंडात त्याला एका जागी स्थिर राहून शिकारीसह शेती करण्याची कला अवगत झाली. सभोवतालचे रानटी विश्व (Wild world) हेच त्याच्या अन्नसुरक्षेचा व शरीर संरक्षणाचा आधार होते. डोंगरातील गुहेत वास्तव्य करणे, रानातील विविध खाद्यपदार्थ गोळा करणे, जंगली श्वापदांची शिकार करून खाणे, मृत प्राण्यांचे कातडे अंग झाकण्यासाठी व थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरणे हे त्याचे जगणे होते. आदिमानवाला अन्न भाजून व शिजवून खाण्याची कला अगदी उत्तर कालखंडात अवगत झाली, असो..एकूणच मानवी संस्कृती (सभ्यता) ही निसर्गातील जल, जंगल, कुरण, वाळवंट आदी सृष्टी व्यवस्था (Eco system) यांच्या आधारे विकसित झाली आहे. पुढे पशुपालन व शेती हा मानवी उत्क्रांतीचा मैलाचा दगड ठरला. मानवाने भटक्या अवस्थेतून स्थिर होताना रानटी प्राण्यांना माणसळवणे (Domestication) ही कला अवगत केली. पुढे रानटी वनस्पतींपासून वैविध्यपूर्ण पिकांची वाणे निर्माण (Cultivation) केली व तो शेती करू लागला. ही प्रक्रिया गेली दहा हजार वर्षे अव्याहत सुरु आहे. पुरातत्व व मानववंश अभ्यासकांच्या मते, त्याला स्थिरस्थावर व्हायला सुरुवातीचे चार हजार वर्षे मोठा संघर्ष करावा लागला..औद्योगिकीकरण व जागतिकीकरण अशा टप्प्यावर जगभरातील मानव जात आजही नैसर्गिक सृष्टी व्यवस्थेवर अवलंबून आहे. पोटासाठी अन्न निर्मितीला शेती व तत्सम स्रोतांशिवाय पर्याय नाही. आजचे बहुतांशी जन समुदाय सृष्टी व्यवस्थेशी नाते जोडून आहेत. रानटी म्हणजे Wild, Domestication, Cultivation व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान (Modern science and technology) या समुचित प्रक्रिया मानवी विकासाच्या मूलभूत आधार ठरल्या आहेत. आजच्या मानवी उपजीविकेवर या दीर्घ प्रक्रियेचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी निसर्ग घटकांचा आधार घेत असताना हवामान बदल, दुष्काळ व सुकाळ या घडामोडींशी जुळवून घेण्याची मानसिकता येथील ग्रामवासीयांनी जपली आहे..Village Development: हिवरे बाजार आदर्श गावांसाठी प्रेरणास्रोत.जैव-सांस्कृतिक वारसाआपल्या महाराष्ट्र देशाच्या कानाकोपरा धुंडाळला घेतला तर मोठे वैविध्य नजरेस पडते. एक विशाल जैवसांस्कृतिक वारसा (Bio-cultural heritage) ध्यानी येतो. झपाट्याने बदलणारे भूप्रदेश (landscape changes) वेगवान नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आजही मोठ्या आव्हानांना तोंड देत निसर्गकेंद्री जीवनशैली टिकून आहे. त्यात आदिम जनसमुदाय, आदिवासी, भटके, पशुपालक ते जिरायती-बागायती शेतकरी,असे नानाविध जनसमुदाय मोडतात. महाराष्ट्राच्या भूमीत अशी ही निसर्गनिष्ठांची मांदियाळी कशी उत्क्रांत झाली असेल, त्यात विविध सृष्टी-व्यवस्थांची काय भूमिका असेल, जैवसांस्कृतिक वारसा कसा निर्माण झाला असेल, नैसर्गिक मूल्य जपणारा गावसमाज कसा विकसित झाला असेल, त्यात भू-पर्यावरणीय विषयाचे महत्त्व काय, अशा प्रश्नाची उत्तरे शोधणे हे मोठे रंजक कार्य आहे..राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा... या कवी गोविंदग्रजांच्या कवितेत आपण महाराष्ट्राचे वर्णन वाचतो. त्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत दख्खन पठार व सह्याद्री पर्वतमालेचे मोठे महत्त्व आहे, या भूरूपांचा निर्मिती कालखंड किमान साडेसहा कोटी वर्षे इतका प्राचीन आहे. जिज्ञासू अभ्यासकांनी माधवराव गाडगीळ यांचे ‘उत्क्रांती : एक महानाट्य’ व पूर्णिमा फडके व शर्मिला देव यांनी लिहिलेले ‘सह्याद्री : निसर्गाचा एक अनमोल ठेवा’ ही पुस्तके अवश्य वाचावीत..लोकोपयोगी सृष्टी व्यवस्थामुख्यत्वे सह्याद्री व दख्खन पठाराच्या आधारे नानाविध परिसंस्थांची (सृष्टी व्यवस्था) निर्मिती झाली आहे व त्यातूनच विपुल अशी जैवविविधता पण आकाराला आलेली आहे. या सृष्टी व्यवस्थांच्या आधारे, नव्हे तर त्या सर्व नैसर्गिक व्यवस्थांचा एक घटक म्हणून मानवी समुदायाने आपली एक जीवनशैली / संस्कृती निर्माण केली आहे. समुद्र ते नदी, नाले, तलाव, झरे यांची जल परिसंस्था, तिच्यातील जलचर व उभयचर सजीवांची जीविधता. झुडपी, पानझडी जंगल ते सदाहरित-नीम सदाहरित जंगल परिसंस्था, तिच्याशी संबंधित नानाविध वृक्षराजी, वेलीपासून ते अगदी हत्ती, वाघ या प्राण्यांसह अधिवास करणारे पशू-पक्षी असे अनंत कोटीचे जैववैविध्य जिज्ञासूंना वेड लावणारे आहे. समर्थ रामदासांच्या ‘बाग प्रकरणा’त या जैव-श्रीमंतीचे वर्णन आलय. दख्खनच्या पठारावर गवताळ रानांच्या परिसंस्थेचा तर वरचष्मा आहे. पठाराच्या अगदी मधोमध गवताळ रान आढळते. शेकडो प्रकारची तृण प्रभावळ व तिच्या संगतीत राहणारे माळढोक पक्षी (सध्या धोक्यात असणारा), लांडगा, कोल्हा, खोकड अशी किती तरी नावे...!.कालौघात पुढे निसर्ग निर्मित परिसंस्थांचे रूपांतर शेती, पशुपालन यात झाल्यामुळे गृहसंवर्धित प्रकारची जीविधता गावरान पिके व पाळीव प्राण्याच्या रूपात निर्माण झाली. या सर्व घटकांशी मिळून मिसळून पशुपालक, शेतकरी, मच्छीमार, आदिवासी इत्यादी मानवी घटकांनी आपले जगणे सुसह्य केल्याचे दिसते..पुढील आव्हानेगेली अनेक दशके महाराष्ट्रातील सर्व नऊ कृषी हवामान विभागातील पर्यावरणीय समस्या झपाट्याने वाढत आहेत. सह्याद्री, सातपुडा, दख्खन पठार आदी भूभाग वाचवण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था झटत आहेत. सरकारवर दबाव आणत आहेत.गुजरात ते केरळ असा पसरलेला सह्याद्री जागतिक व स्थानिक दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र बनला आहे. गत दीड दशके पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या सह्याद्रीची सामाजिक व सरकारी पातळीवर धोरणात्मक मीमांसा होत आहे, काही निर्णय घेतले जात आहेत. पण त्यात स्पष्टतेपेक्षा गोंधळच अधिक आहे. गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारायचा की कस्तुरीरंगन समितीचा, या विषयी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात संवाद नाही. सर्वच राजकीय पक्षांना सह्याद्री अधिवासापेक्षा स्थानिक लोकांत गोंधळ निर्माण करून ‘स्व:अधिवास’ जपण्यात अधिक रस आहे..महाराष्ट्र देशीचे हे निसर्ग वैभव व ज्ञात-अज्ञात भू-पर्यावरणीय यांचा आढावा घेणे गरजेचे आहे. आज घडीला वेगवान अशा अतिरेकी विकास प्रक्रियामुळे निसर्गपूजक, शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कर्ता गावसमाज अखेरच्या घटका मोजतो आहे. या बिकट परिस्थितीत पुन्हा निर्माण न होणाऱ्या परिसंस्थांना कसे वाचवायचे, याची चिंता सर्वांना सतावते आहे. एकूणच मानवी अस्तित्व हे केवळ निसर्गावर अवलंबून आहे. एक नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाली तर तिची जागा दुसरी घेते व नव्याने अनुरूप सजीव सृष्टीला जन्म देते. निसर्गावर याचा काडीचाही परिणाम होत नाही; या उलट मानवी अस्तित्व नष्ट होण्याची अधिक शक्यता आहे. यावर मार्ग शोधण्यासाठी ‘लोक-सृष्टी’ या पाक्षिक लेखमालेतून ‘सृष्टी-व्यवस्था व विविध लोक समुदाय यांचे नाते, यांवर विचार, विनिमय, चर्चा व मंथन होणार आहे.९४२१३२९९४४vijaysambare@gmail.com(लेखक शेती, पशुपालन व शाश्वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.