Kolhapur News: निवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची अथवा जिल्हा परिषदेची, आंबेओहळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित होतोच. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आम्हीच सोडविणार, असे छातीठोकपणे विविध पक्षांचे उमेदवार प्रकल्पग्रस्त राहत असलेल्या गावांत जाऊन सांगतात. मात्र, निवडणूक संपल्यानंतर प्रश्न ‘जैसे थे’ राहतात. उत्तूर (ता. आजरा) परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला. २०२१ मध्ये प्रकल्पात पाणी साठविले. मात्र, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे घोंगडे शासनदरबारी अनेक वर्षांपासून भिजत पडले आहे..आंबेओहळ प्रकल्पाचा मुद्दा १९९५ पूर्वीपासून अनेक निवडणुकीत गाजत होताच. सुपीक जमीन बुडवून विकास नको, आम्हाोला निवडून द्या. धरण रद्द करतो, असे प्रचाराच्या सभेत उमेदवार छाती बडवून सांगायचे. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला. प्रकल्प कोणी पूर्ण केला यासाठी राजकीय मंडळींचा श्रेयवादही गाजला..Padalse Dam Project: पाडळसे, बलून बंधारे सिंचन प्रकल्पासाठी निधीची तरतूद व्हावी.उत्तूरसह आरदाळ, हालेवाडी, करपेवाडी, होन्याळी या गावांतील शेतकऱ्यांनी प्रकल्पाला आपल्या जमिनी दिल्या. गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पात पाणी अडविण्यात आले. प्रकल्पातील शेवटच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्याशिवाय प्रकल्पात पाण्याचा थेंबही अडविणार नाही, ही घोषणा मागे पडली. .Dam Desiltation Project: प्रायोगिक तत्त्वावर सहा मोठ्या धरणांतील गाळ काढण्याचा प्रकल्प सुरू.आता प्रत्येक निवडणुकीत प्रकल्पाचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही घोषणा पुढे आली. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन जलसिंचनसाठी वापरण्यात आले. पुनर्वसन मात्र ६५ टक्क्यांवर पोहोचलेलेच नाही. धरणग्रस्तांना लाभक्षेत्रातील जमिनी मिळाल्या. मात्र, त्या पाण्यापासून लांब आहेत. पात्राच्या काठावर विद्युत पंप बसविण्यास जागा मिळत नाही. त्यामुळे उपसा सिंचन कसे राबवायचे, हा प्रश्न आहे..दाद कुणाकडे मागायची ?निवडणुका आल्या की, राजकारण्यांना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा आठवतो; परंतु निवडणुकीनंतर पुन्हा त्यांचे प्रश्न दुसऱ्या निवडणुकीच्या प्रतीक्षेत कायम असतात.शासनाने पुढाकार घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा असली तरी या कार्यवाहीकडे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.