Bhandara News: मोहाडी तालुक्यातील निलज (बुज) येथील वेणगंगा नदीवर प्रस्तावित सौर ऊर्जा उपसा सिंचन योजना सन २०१८-१९ मध्ये मंजूर झाली होती. योजना कार्यान्वित झाल्यास निलज परिसरातील सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. मात्र, जागा निश्चितीच्या वादात अडकलेली ही योजना गेल्या दोन वर्षांपासून ठप्प असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेसाठी सुरुवातीला देहाडा येथील जागा प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, ही जागा राष्ट्रीय महामार्गालगत येत असल्याने तेथील पूर्वीचे बांधकाम हटवावे लागणार होते. त्यामुळे भू-अधिग्रहण व इतर अडचणी निर्माण झाल्या. अखेर भंडारा येथील महाऊर्जा कार्यकारी अभियंत्यांनी सदर जागा रद्द करून नव्या जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले..Irrigation Projects Issues: पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शिवार कोरडेच.यानंतर दोन वर्षांचा कालावधी लोटूनही अंतिम जागेचा गुंता सुटलेला नाही. निलज (बुज) येथील सौर उपसा सिंचन योजनेकरिता सन २०१९-२० मध्ये सुमारे १५.१३ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, गोंदिया यांनी ३० मे २०१९ रोजी कामाचा आदेशही दिला होता..मात्र, जागेचा वाद आणि स्थानिक विरोधामुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, प्रस्तावित ठिकाणी पंपगृहाचे बांधकाम अर्धवट झाले असले तरी पाइपलाइन टाकण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे कंत्राटदारालाही काम थांबवावे लागले. या साऱ्या प्रक्रियेत दोन वर्षे वाया गेली असून परिसरातील शेतकरी अद्याप सिंचनाच्या प्रतीक्षेत आहेत..Bawanthadi Irrigation Scheme: ‘बावनथडी’चे पाणी सोडा; अन्यथा आंदोलन.योजनेच्या आराखड्यात बदल करून नवीन डिझाइन तयार करण्यात आले असून त्याला राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थेची (एनआयटी) मान्यता मिळाल्याची माहिती जलसंधारण विभागाकडून देण्यात आली आहे. हायड्रॉलिक्स व स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये सुधारणा करून सुधारित अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे. मात्र, जागा अंतिम न झाल्याने प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडली आहे..या योजनेमुळे निलज परिसरातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पाण्याची हमी मिळणार होती. दोन वर्षांपासून अडकलेल्या जागेच्या प्रश्नामुळे मात्र ९०० हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचितच राहिले आहे. शासन व जलसंधारण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून जागेचा गुंता सोडवावा आणि योजना मार्गी लावावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.