Nashik News: नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार केला असून सर्वदूर काढणीस आलेल्या खरीप पिकांसह भाजीपाला व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने मका, सोयाबीन, कापूस, कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात २ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. संकटांचा सामना करणारा शेतकरी पुन्हा नुकसानीमुळे अडचणीत सापडला आहे. खरिपात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची भीषण परिस्थिती आहे..प्रामुख्याने २७ व २८ सप्टेंबर रोजी दोन दिवसांत जिल्हाभर पावसाने थैमान घातले. यामध्ये १५ तालुक्यांतील १,५१९ गावे अतिवृष्टीच्या तडाख्यात बाधित झाली आहेत. यामध्ये २ लाख ८३ हजार ५०६ शेतकऱ्यांचे २ लाख ६५ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे.यामध्ये मका पिकाचे सर्वाधिक दीड लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. याशिवाय सोयाबीन, कापूस, बाजरी, भात या पिकांचे नुकसान आहे. तर भाजीपाला पिकांमध्ये कांदा, टोमॅटोसह इतर भाजीपाला तसेच द्राक्ष, डाळिंब, सीताफळ अशा फळ पिकांचे नुकसान आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालानुसार पुढे आले आहे..Maharashtra Flood Crisis : आम्ही तुमच्या सोबत आहोत....अतिवृष्टीचा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसला आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान आहे. याशिवाय येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा, निफाड, पेठ, सुरगाणा, नाशिक, दिंडोरी या तालुक्यांत हजारो हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, कळवण व देवळा तालुक्यांत तुलनेत कमी आहे. सुरुवातीला पेरण्या पूर्ण करताना अडचणी आल्या तर आता पिके काढणीसाठी आली असताना शिवारांची दैना झाली आहे..अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यात मका पिकांचे नुकसान मोठे आहे. मका पावसात भिजला तर काढणी करून शिवारात पडलेली कणसे आता पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली तर काही ठिकाणी तरंगताना भीषण चित्र पाहायला मिळत आहे. ऊस देखील भुईसपाट झाला आहे. सोयाबीनचे पीक देखील कापणीवर असताना पावसात भिजले. तर अनेक ठिकाणी पाण्याखाली गेल्याने नुकसान वाढले आहे..Farmer Issue: ‘शक्तिपीठ’ऐवजी ८० हजार कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरा :सुळे .ही परिस्थिती प्रामुख्याने येवला, नांदगाव, चांदवड, देवळा, सटाणा, कळवण, सिन्नर निफाड या तालुक्यांमध्ये आहे. तर खरीप कांदा उत्पादक पट्ट्यात देखील खरीप कांद्याचे नुकसान आहे. याशिवाय लेट खरीप कांदा रोपवाटिका खराब झाल्या आहे. तर रब्बी कांद्याच्या रोपवाटिकामध्ये पेरलेले बियाणे पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेले आहे. .भाजीपाला, द्राक्षासह झेंडूचे नुकसाननाशिक इगतपुरी, दिंडोरी, चांदवड, सिन्नर तालुक्यांत टोमॅटो लागवडी बाधित झाल्या आहेत. याशिवाय कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, वाटाणा व विदेशी भाजीपाला लागवडी बाधित झाल्या आहे. दसरा दिवाळीच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी झेंडू फुलांच्या लागवडी खराब झाल्या आहेत. आगाप द्राक्ष लागवडी पावसाच्या तडाख्यात गेल्या काही वर्षांत अडचणीत सापडल्या. त्यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर पर्याय उभा केला. मात्र वाऱ्याने सटाणा तालुक्यात क्रॉप कव्हर उभारणीचे नुकसान आहे. .जिल्ह्यातील पीकनिहाय नुकसान असेपीक बाधित क्षेत्र (हेक्टर)मका १ लाख ४९ हजार ३७७सोयाबीन २३ हजार ६७४भात ५ हजार ५७०कापूस १६ हजार १८०भाजीपाला व इतर ३० हजार १२०कांदा ३८ हजार ७८३कांदा रोपवाटिका ३४७द्राक्ष ३१९डाळिंब ५५३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.