Nashik News: कांदा अनुदान योजना २०२२-२३ अंतर्गत फेरछाननी नंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरणसंबंधी १२ ऑगस्ट रोजी शासन निर्णय जाहीर झाला होता. जिल्ह्यात ९ हजार ९८८ शेतकरी पात्र ठरले. या चार महिन्यांत अनुदान रखडत वितरित होत असल्याची स्थिती आहे. ३२०० शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे..अनुदान देण्याबाबतचा निर्णय ऑगस्ट महिन्यात पात्र जाहीर करण्यात आला. त्यानंतर दिवाळीसारख्या सणाला देखील शेतकऱ्यांना पैसे खात्यावर जमा झाले नव्हते. हा प्रकार ‘ॲग्रोवन’ने उजेडात आणल्यानंतर अखेर अनुदान वितरण सुरू झाले. यापूर्वी थेट पणन संचालकांच्या स्तरावरून थेट खात्यावर अनुदान दिले जात होते. या वेळी हे अनुदान जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाले. त्यांनी ते तालुका पातळीवर सहाय्यक उपनिबंधकांकडे वितरित करण्यासाठी वर्ग केले आहेत..Onion Storage Subsidy: कांदा चाळीसाठी प्रतिटन चार हजारांचे अनुदान.सर्वाधिक अनुदान हे देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्री झालेल्या शेतकऱ्यांचे ५ कोटी ४६ लाख रुपये असताना ते वितरित झाले. दिंडोरी, नांदगाव, मालेगाव, बागलाण व सिन्नर तालुक्यांत अनुदान तांत्रिक अडचणीमुळे वितरित झाले नसल्याची स्थिती आहे..काही बाजार समित्यांमध्ये लाभार्थी मृत, तर काही खात्यांची पडताळणी झाली नाही. काही बँक खाते बंद असल्याने वितरण करण्यात अडचणी येत आहेत. मालेगाव येथे एकाही लाभार्थ्याला अनुदान मिळाले नाही. इतर ठिकाणी अनुदान वितरित झाले मात्र मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तालुक्यात दिरंगाई का झाली, याबाबत सवाल उपस्थित होत आहे..Onion Subsidy : कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त अनुदान जाहीर करा.अनुदान वितरण स्थितीबाजार समिती लाभार्थी अनुदान(रुपये) शिल्लक लाभार्थी शिल्लक अनुदान रक्कमनाशिक १ ४३,६५२ ० ०लासलगाव १४ ३,०९,१२० ० ०चांदवड १२ २,५५,०८० ० ०देवळा ७ १,९०,४७० ० ०उमराणे २४९७ ५,४६,८५,२२० ० ०.येवला १६८२ ३,६२,१९,८३४ ० ०दिंडोरी १५४ २५,७१,०८३ १ २१,५७७मनमाड १६२५ २,६९,८२,१५५ ३१ ६,५०,०००मालेगाव २८३५ ४,२६,२३,८७५ २८३५ ४,२६,२३,८७५मल्हारश्री खासगी, चंदनपुरी(मालेगाव) ३४६ ५१,६६,६८२ ३४६ ५२,६६,६८२सटाणा ३१९ ५९,७२,०२९ १८ ३,२७,७६२नामपूर ४८० १,०२,६२,२९७ १८ ४,३१,६२०सिन्नर १६ ५,९६,९५६ ४ १,८०,६६७.पावसामुळे यंदा लागवड केलेला कांदा सडून गेला. केलेला खर्चही निघाला नाही. फेरछाननीअंतर्गत पात्र होऊनही चार महिन्यांपासून अनुदान नाही. सरकारने दिशाभूल न करता वेळीच शेतकऱ्यांना अनुदान वर्ग करावे.मनोहर खैरनार, पात्र लाभार्थी, डोंगराळे, ता.मालेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.