Yavatmal News: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेत राहिलेल्या त्रुटींमुळे जिल्ह्यातील ४० हजारांहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे..ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. दीड हजार रुपयांची मासिक मदत थांबल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला; जळगावमध्ये महिलांचा संताप.महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह महिला व बाल विकास कार्यालयात धडक देत याबाबत नाराजी व्यक्त केली होती. या परिस्थितीची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने सुधारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे..Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर ताण; आर्थिक सर्वेक्षणात चिंता व्यक्त.त्यानुसार, ई-केवायसीमध्ये त्रुटी असलेल्या महिलांची स्वतंत्र यादी तयार करून अंगणवाडी सेविकांमार्फत घरभेटी देत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. शासनाने यापूर्वी एका रेशनकार्डवर दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्याने अपात्र ठरलेल्या महिलांची ज्या पद्धतीने पडताळणी केली होती, त्याच धर्तीवर ही प्रक्रिया राबविली जाणार आहे..लाभ सुरू करण्याचा प्रयत्नपडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांना दीड हजार रुपयांचा लाभ पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.