संजीव चांदोरकरFood Security: १६ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी ‘जागतिक अन्न दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मानवी शरीराला ‘अन्नकोष’ म्हणतात. मानवी जीवनातील अन्नाचे (आणि अर्थातच पाणी, हवेचे) महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. अन्न फक्त मनुष्याच्या भरण-पोषणासाठीच महत्त्वाचे नाही तर त्याला अनेक आर्थिक आणि बिगर आर्थिक आयाम आहेत. .विशेषतः भारतासारख्या शेतीप्रधान, मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी. कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत, संपत्तीचे विकेंद्रीकरण, शेतकऱ्यांचे जमिनीशी असणारे भावनिक बंध, हाताला काम आणि आत्मसन्मान राखून मिळवलेले उत्पन्न, कुटुंबांची क्रयशक्ती, मानवी संस्कृती हे पैलू आहेत..Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख.या सर्व गोष्टी साध्य करण्यामध्ये मोठा अडथळा तयार झाला आहे तो शेती, पशुसंवर्धन, मासेमारी, तयार अन्नपदार्थ उद्योगात गेल्या काही दशकांत घुसलेल्या/ घुसू पाहणाऱ्या महाकाय कॉर्पोरेट भांडवलाचा!.जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने खालील मागण्या/ कार्यक्रमांवर सार्वजनिक चर्चा झाली पाहिजे : जागतिक अन्न क्षेत्रातून, लाखो हेक्टर जमिनी बळकावून, कोट्यवधी टन अन्नधान्य आपल्या कब्जात ठेवून मूठभर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या ताब्यात ठेवलेला जागतिक अन्नधान्य व्यापार त्यांच्या तावडीतून सोडवला पाहिजे. ज्याची झलक २०२० मध्ये तीन शेती कायदे लादण्याच्या निमित्ताने आपण भारतात बघितली. आणि भारतातील शेतकरी आंदोलनाने त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे हे देखील शिकवले..Food Processing Industry : सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत कोल्हापूर राज्यात दुसरे.अन्नधान्य देखील सट्टेबाजीसाठी वापरणाऱ्या कमोडिटी एक्स्चेंजवर वित्त भांडवलाची पकड ढिली केली पाहिजे. तयार अन्न पदार्थ (रेडी टू इट) सेक्टरमध्ये मोठी कार्पोरेट, एकसाची, एकच चवीचे पदार्थ, शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी त्यात प्रिझर्व्हेटिव घालणारे, तोटा सहन करण्याच्या ताकदीमुळे कोट्यवधी लहान उद्योगांना, ज्यात बहुसंख्य स्त्रिया आहेत, देशोधडीला लावणारे बिग कॅपिटल हुसकावून लावले पाहिजे..शेती / लहान उद्योग किफायतशीर नाहीत अशी ब्रेनवॉश करणाऱ्या मांडणीतून बाहेर येऊया. वाढीव मूल्यवृद्धी / उत्पादकता सर्वांत महत्त्वाची. मूल्यवृद्धी आणि रुपयातील नफा या दोन भिन्न गोष्टी आहेत..मूल्यवृद्धी करणाऱ्याला रुपयातील नफा होतो की नाही हे फक्त शासकीय धोरणे, आर्थिक धोरणे, मदती यावर निर्भर असते. कॉर्पोरेट क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांचा नफा सोईस्कर शासकीय धोरणांमुळे आणि लाखो कोटी रुपयांच्या सार्वजनिक / शासकीय मदतीतून येत असतात. शेती/ लहान उद्योग किफायतशीर होण्यासाठी लागणारी शासकीय/ बँकिंग धोरणे नाहीत. ती किफायतशीर न होण्यामागे याच कॉर्पोरेट लॉबीज आहेत..आज या मागण्या /कार्यक्रम अतिरेकी, पुस्तकी वाटतील. कॉर्पोरेट भांडवलशाही ते जनमानसात रुजू देणार नाही. पण त्याचे प्रतिध्वनी आसमंतात उमटत ठेवले पाहिजेत. हीच दिशा असणार आहे भविष्यातील अन्न, पाणी उद्योगाशी संबंधित जन आंदोलनांची. आज बिग कार्पोरेटचा ग्राहक असणारा तरुण वर्ग आणि शेतकरी, मासेमार, स्त्रिया, त्यांच्या पुढच्या पिढ्या कॉर्पोरेट क्षेत्राविरुद्ध उभ्या राहतील. कारण हा विचारसरणीचा मुद्दा नाही. तर मानवी अस्तित्वाच्या आणि न जन्मलेल्या पिढ्यांच्या भवितव्याच्या सर्व आयामांना कवेत घेणारा हा मुद्दा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.