Pandharpur News : कार्तिकी शुद्ध एकादशीच्या पर्वावर रविवारी (ता. २) पंढरपुरात कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा होत असून, मंदिर प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक रविवारी पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा होणार आहे. .यंदाच्या यात्रेदरम्यान १० ते १२ लाख वारकरी पंढरपुरात येण्याची शक्यता असून, त्यांच्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली..Kartiki Ekadashi: दिंडीधारकांनी आगाऊ प्लॉट्सची मागणी नोंदवावी.कार्तिकीवारीच्या सोहळ्यात सहभागासाठी निघालेल्या राज्यातील विविध संतांच्या पालख्या-दिंड्यांनी पंढरपूरकडे मार्गक्रमण केले आहे. शनिवारी (ता. १) या सर्व पालख्या-दिंड्यांचे आगमन पंढरपुरात होणार आहे. त्याशिवाय वारकऱ्यांची गर्दीही होत आहे. एसटी, बस, खासगी वाहनाने वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट परिसरात वारकऱ्यांची गर्दी वाढली आहे..Yatra Management: कार्तिकी यात्रेदरम्यान मंदिर परिसरात वाहनांना बंदी.यंदा दर्शनरांगेत वॉटरप्रूफ ताडपत्री शेड, जादा दर्शनमंडप, आपत्कालीन मार्ग, विश्रांती कक्ष, बसण्याची व्यवस्था, कूलर-फॅन, मिनरल वॉटर, तसेच लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आली आहे. यात्रेच्या काळात वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र, स्वयंसेवी संस्थामार्फत मोफत वैद्यकीय सेवा तसेच आरोग्य विभागामार्फत आयसीयू व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय सोलापूर महानगरपालिकेकडून रेस्क्यू व्हॅन, सिसफायर यंत्रणा, १२५ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, कंट्रोल रूम, वायरलेस व्यवस्था, मेटल डिटेक्टर, मोबाइल लॉकर, सार्वजनिक प्रसारण प्रणाली आणि बँग स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे..दर्शनरांगेत वारकऱ्यांना चहा, साबुदाणा खिचडीदर्शनरांगेत नवमीपासून चहा, साबुदाणा खिचडी तसेच रिद्धी-सिद्धी मंडपात दशमी ते द्वादशीपर्यंत अन्नछत्र सुरू राहील. त्याशिवाय श्री विठ्ठल-रुक्णिणीमातेचे लाईव्ह दर्शन मंदिर समितीच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल ॲपवरही उपलब्ध असून, संपूर्ण पंढरपूर शहरात एलईडी स्क्रीनद्वारेही दर्शनाची सुविधा देण्यात आली आहे, अशी माहितीही औसेकर महाराज यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.