Childhood Days: हरवलेल्या दुपारच्या आठवणीही अशाच अपार आहेत. त्यात फेरीवाले आहेत. दमून घरी येणारे पहाटेच्या पाळीतले कामगार आहेत. संथ लयीतला निसर्ग आहे. हवीहवीशी सुस्तता आहे. तो प्रहर खऱ्या अर्थाने गजबजाटापासून दूर होता. याच दुपारप्रहरी उन्हाळ्यात सरबत आइस्क्रीम घेऊन तरूण वयातला तांबुस रंगाचा देखणा चंदू परदेशी यायचा.