Pune News: ‘‘ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो, अशा ठिकाणी आता अतिवृष्टी झाली आहे. असे चित्र यापूर्वी कधी नव्हते. या पावसाने उभ्या पिकांसह, पशुधन आणि शेतातील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने नुकसान मोठे झाले आहे. पिके कुजून गेली आहेत. अशी परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकारने दीर्घकालीन उपाय योजनांबरोबरच, तातडीने आर्थिक मदत करावी,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केले आहे. .मंगळवारी (ता.२३) श्री. पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, दक्षिण नगर हा भाग कमी पावसाचा आहे. मात्र आता याच भागात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या संसारावर झाला आहे..Agricultural Loss: परिंच्यातील पिके पाण्यामुळे उद्ध्वस्त.या महिन्यात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, काही भागात कापूस घेतला जातो, अन्य पिके घेतली जातात. सोयाबीनचे पीक हे भरवशाचे पीक असते. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि बाकीच्या पिकांची वाढ झाली, पण पाच दिवस वाफ्यात पाणी राहिले आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिके कुजून केली. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.’’.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला साह्य करण्याची योजना आहे. राज्यामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्याचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करून घेणे आणि तातडीने त्यांना नुकसान भरपाई देणे, या दोन गोष्टी करण्याची गरज आहे,’’ असेही श्री. पवार म्हणाले..‘‘पीक पशुधनासह शेतातील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने शेतीतून उत्पादन येण्याचा मार्ग कायमचा थांबतो. त्यामुळे यावेळची मदत फक्त पंचनामे करून, पीक गेले म्हणून चालणार नाही. पिकासाठी मदत द्यावीच लागेल. पण जमिनीसाठीही मदत करावी लागेल. त्यासोबत पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत..Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या संकटात शासन बळीराजाच्या पाठीशी ः भरणे.या सगळ्या नुकसानीकडे राज्य सरकारने बघितले पाहिजे, हे काम सरकारने गतीने केले पाहिजे. पंचनामे तातडीने करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे, पिकांची पाहणी करणे आणि वास्तव पंचनामे करणे, गरजेचे आहे. यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत ही अभूतपूर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे, अशी आम्ही अपेक्षा करतो. राज्य सरकार याचा गांभीर्याने विचार करेल,’’ असेही श्री. पवार म्हणाले..‘पाहणी झाल्यावर तातडीची मदत गरजेची’‘‘लोकप्रतिनिधी, काही मंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पाहणी झाल्यावर तातडीची मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी राजाला पुन्हा एकदा कसे उभे करायचे, या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावे. हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचे आहेत, असे सांगितले आहे. या वेळचे वैशिष्ट्य असे आहे, की हवामान खाते जे जे सांगत आहे, ते ते घडत आहे. अगदी सुरुवातीपासून मे महिन्याच्या कालखंडातही पाऊस पडला. सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो. तेव्हापासून आतापर्यंत हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावध केले आहे. त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे,’’ असेही श्री. पवार म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.