Ear Tag Shortage: पशुधन बाजारात भासतेय ‘इअर टॅग’ची चणचण
Livestock Market Crisis: राज्यातील सर्व पशुधनाला इअर टॅग लावणे आणि त्याची नोंद ‘भारत पशुधन प्रणाली’ अंतर्गत करणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र प्रत्यक्षात पशुसंवर्धन विभागाकडेच ‘इअर टॅग’चा तुटवडा असल्याने शेतकरी, व्यापारी आणि बाजार समित्यांची मोठी कोंडी झाली आहे.