Palghar News: किनारपट्टीचे नैसर्गिक रक्षण, पर्यावरणाचा समतोल टिकवणारी कांदळवने विकासकामे, अतिक्रमणे, मानवी हस्तक्षेपाने धोक्यात आली आहेत. डहाणू-तलासरीतील कांदळवनाचे ४९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने संवर्धनासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त होत आहे. .वादळांचा तडाखा कमी करणे, समुद्रकिनाऱ्याची धूप थांबवणे, जैवविविधतेचे संवर्धन करणाऱ्या कांदळवनांना ‘कार्बन सिंक’ म्हणून ओळखले जाते. वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची त्यांची क्षमता जास्त असल्याने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ते पर्यावरणासाठी संरक्षक भिंत ठरतात. राज्य शासनाने कांदळवनांचे संरक्षण, पुनर्लागवड आणि संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेण्याची आवश्यकता पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत..Environmental Development: वाट पर्यावरणपूरक विकासाची!.डहाणू, तलासरीतील ४९४ हेक्टर कांदळवनाला राखीव दर्जा मिळाला. वाढवण, देताळे, चिंचणी, वळदे, नरपड, आंबेवाडी, चिखले, घोलवड, बोर्डी, चंडीगाव आणि कोलवली भागांतील कांदळवन परिसर पर्यावरण रक्षणाचे महत्त्वाचे काम करत आहेत. विविध मासे, खेकडे, शिंपले तसेच स्थलांतरित, स्थानिक पक्ष्यांचे प्रजनन व निवास आढळतो..Environmental Research: नुसते संशोधन नव्हे, कार्यप्रवणता महत्त्वाची!.पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपर्यावरणीय फायद्यांसोबतच कांदळवन पर्यटनाची संधी निर्माण करू शकते. योग्य नियोजन केल्यास स्थानिकांना रोजगारनिर्मितीची साधने उपलब्ध होऊ शकतात. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली पर्यावरणाला हानी होणार नाही. याची दक्षता घेणे तितकेच आवश्यक आहे..कांदळवनांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक जीवसृष्टीचे प्रकार आढळतात. कांदळ झाडांचे लाकूड दीर्घकाळ पाण्यात टिकते, तर त्यांच्या पानांवर मिठाचे स्फटिक जमा होण्याची वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया आढळते. नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करण्यास कांदळवन मदत करतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.