New Delhi News: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ६३,५०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. .ही तरतूद गेल्या वर्षीएवढीच कायम ठेवण्यात आली असल्याने योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत सरकारकडून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक मदत सहा हजार रुपये एवढीच कायम राहणार आहे..PM Kisan Samman Nidhi: महिनाभरापासून संकेतस्थळ बंद असल्याने ‘सन्मान निधी’ पासून लाभार्थी वंचित .पीएम किसान योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत जमीनधारक शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून दर वर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यात वितरीत केली जाते. या योजनेचा सुमारे १० कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ३.७० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे..आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते जारी करण्यात आले आहेत. डिसेंबरमध्ये अर्थसंकल्पापूर्वी झालेल्या बैठकीत, शेतकरी संघटना आणि शेती क्षेत्राशी संबंधितांनी पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली होती. परवडणाऱ्या आणि दीर्घकालीन शेती कर्ज पुरवठ्याची तरतूद करण्याचीही सूचना त्यांनी केली होती. दरम्यान, २०२६ च्या अर्थसंकल्पात पीएम किसान रकमेत बदल केलेला नाही..PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो.शेतकरी संघटनांनी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत कायम ठेवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. पीक उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे ही मदत अपुरी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकांमध्ये या रकमेत किमान ९ हजार ते १२ हजारांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती..पीएम किसानचा २२ वा हप्ता कधी मिळणार?पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी जारी केला होता. यामुळे २२ वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जारी करण्यात आला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.