Dharashiv News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काही पक्षांकडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची हायटेक प्रचार सुरू आहे. काही नेते तर ग्रामीण भागात प्रचारासाठी थेट हेलिकॉप्टरमधून दाखल होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आता प्रचार शिगेला पोचला आहे..जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आता काही दिवसच शिल्लक आहेत..Local Body Elections: सोलापूर जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादींना सहानुभूतीची शक्यता.जिल्ह्यातील विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून गावोगावी प्रचार सभा घेऊन आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. विरोधकांवर टीकेचा भडिमारही केला जात आहे. दररोजच कोणत्या ना कोणत्या गावात ध्वनिक्षेपकाचे आवाज ऐकू येत आहेत..Local Body Election: मोहोळ तालुक्यातील ७२ ग्रा.पं.च्या निवडणुकांचे वेध.याशिवाय टेम्पो, ऑटोरिक्षांवर ध्वनिक्षेपक लावून उमेदवारांकडूनही जोरदार प्रचार केला जात आहे. पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेणेही सुरू आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५५ गट असून, आठ पंचायत समित्यांचे ११० गण आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. .कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता मिळवायची, असा चंग बांधून प्रचार केला जात आहे. यामध्ये जिल्हास्तरीय नेत्यांना सध्या उसंत नाही. बैठका, पदयात्रांचे नियोजन करून नेतेमंडळी पहाटेच घराबाहेर पडत आहेत..यात आता राज्यस्तरीय नेते मागे नसल्याचे चित्र आहे. प्रचारासाठीचे दिवस लक्षात घेता राज्यस्तरीय काही नेते आता वाहनाऐवजी थेट हेलिकॉप्टरमधून ग्रामीण भागात दाखल होत आहेत. अशा नेत्यांच्या एका जिल्ह्यात एका दिवसात तीन ते चार सभा घेतल्या जात आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.